
मध्यप्रदेशातील भोपाल येथे नौकरी आणी नागपूर येथे कुटूंब. शुक्रवारी रात्री छातीसगड एक्स्प्रेसने भोपाल येथून निघणे, शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचणे आणी रविवारी रात्री पुन्हा नागपूर येथून निघून सोमवारी सकाळी भोपाल ला पोहोचणे, हा नित्यक्रम. भोपाल येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नौकरी करणारी बरीच डॉक्टर मंडळी ह्या प्रवासात सोबत असतात (ह्या नौकरी ची एक नवीन व्याख्या " MCI professor", म्हणजे फक्त आठवड्यातून एक दिवस किंवा MCI चे inspection असेल तेंव्हाच उपस्थित राहणे, एरवी आपल्या शहरात मस्त practice करणे. काय होत असणार त्या विध्यार्थ्यांचे देवालाच माहित. असो ). अश्याच एका प्रवासात AC III tyre च्या बोगीत