Friday, October 18, 2013

चाणक्यनिती

विष्णुदत्त उर्फ चाणाक्क्याच्या वडिलांचा, चनक ह्यांचा मगध चा राजा धनानंद ह्याने वध केल्यानंतर, चाणाक्य मगध राज्ज्यातून पळून गांधार देशातील तक्षशीला विश्वविद्यालयात शिक्षणासाठी गेला (मगध म्हणजे आताचे बिहार राज्ज्य आणि गांधार, सध्याच्या काश्मीर च्या पश्चिमउत्तर चे एक राज्ज्य, मगध पासून १००० मैल दूर). तक्षशीला विश्वविद्यालयात अर्थशास्त्र तथा राज्ज्यशास्त्र ह्या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ चाणाक्याने ह्याच  विश्वविद्यालयात अध्यापनाचे काम केले. ह्या कालावधीत त्यांच्या विध्यार्थ्यांनी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि चाणाक्याने दिलेली त्यांची उत्तरे:

प्र: प्रशासनामध्ये गोपनीयतेची गरज का असते?
: एक नागरिक म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक आपले काम प्रामाणिकपणे करता काय ह्याची तुम्हाला जाणीव नसेल किंवा खात्री नसेल, इतरांनी सांगितलेले तुम्हाला पटतही नसेल, आणि प्रशासनाच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल, अश्या परिस्थितीत प्रशासन चालविण्यासाठी मग गोपनीयता राखण्याची गरज असते

प्र:  आणीबाणी किंवा अराजकतेच्या परिस्थितीत राजावरील मानसिक दबाव त्याचा प्रधानमंत्री कश्याप्रकारे कमी करू शकतो
: कोणत्याही परिस्थितीत मानसिक दबावाखाली येणारा राजा हा कार्यक्षम राजाच असू शकत नाही.प्रत्येक प्रसंगाला यशस्वीरीत्या सामोरे जाण्याची कार्ययोजना निश्चित करण्याची तत्परता एका चांगल्या राजाने दाखविलीच पाहिजे.प्रधानमंत्री जर राजावरील मानसिक दबाव कमी करणारा असण्याची स्थिती निर्माण झाल्यास तोच प्रधानमंत्री राजाचे weak points हेरून राजाला सत्तेवरून केव्हाही दूर करू शक्तो

प्र: राजाने नेहमी फक्त खरेच बोलले पाहिजे काय
: उत्तम राजाला ह्याची गरजच भासावयास नको. राजा जे बोलतोय ते खरेच आहे एवढा जनतेचा विश्वास त्याने निर्माण करावयास हवा

प्र: प्रत्येक जनतेला स्वातंत्र्याची हमी देणारा उत्तम राजा कोणता?
: जनतेची गरज ओळखून ती पूर्ण करण्याची हमी देणारा राजा हा उत्तम राजा. एका गरीब उपाशी माणसाला त्यच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करून हमी देणारा राजा हाच उत्तम राजा कारण त्या व्यक्ती साठी हीच त्याच्या स्वातंत्र्याची हमी ठरते

प्र: राजकारणातील विवाद मिटविण्यासाठी युद्ध हाच पर्याय आहे काय?
: राजकारण म्हणजे रक्तपाताशिवाय सुरु असणारे युद्ध आणि युद्ध म्हणजे रक्तपाताचे राजकारण

प्र: जनतेला त्यांचे कडून गोळा केलेल्या कराचा कश्याप्रकारे विनियोग होतो हे जाणून घेण्याचा हक्क नाही काय?
: देवालयातील दानपेटीत टाकलेल्या पैशाचे पुजारी काय करतो हे कोणी भक्त विचारतो काय? कारण त्याचा देवावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे करवसुलीतून निर्माण केलेल्या सुविधा जनतेच्या दृष्टीस येत असल्यास आणि त्यांचा राजावर पूर्ण विश्वास असल्यास हे जाणून घेण्याचा हक्क आहे हे त्यांच्या मनातही येत नाही

प्र: उत्तम प्रशासन हे तत्वांवर आधारित असावे काय?
: नक्कीच, प्रशासन हे तत्वनिष्ठच असवे. परंतु उत्तम प्रशासन म्हणजे तत्वांबद्धल बोलणे परंतु संपूर्णपणे त्याप्रमाणेच वर्तणूक करणे असे नाही

प्र: एखाद्या विषयवार चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळाने किती वेळ द्यावा?
: हे एका उत्तम राजाला ठरवता आले पाहिजे. योग्य उत्तर त्याला माहित असेल आणि त्यावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता राजात असेल तर नाहक चर्चा करत बसण्यापेक्षा असा विषय, विषयपत्रिकेवर भोजनाचे आधीचा शेवटचा विषय असावा आणि राजाचा निर्णय हाच सर्वानुमते निर्णय झाल्याचा आनंद सर्वाना व्हावा,अश्या तर्हेनेच राजाने चर्चा घडवून आणून विषय लवकर संपवावा

प्र: न्याय आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी राजाने युद्ध करावयास हवे काय?
: निश्चितच. परंतु हे युद्ध राजाच्या परराष्ट्रीय धोरणांच्या विपरीत नसल्यास

प्र: महत्वाच्या बाबी राजापासून लपवून ठेवणाऱ्या प्रधानमंत्र्याला काय शिक्षा करावी?
: प्रधानमंत्री योग्य माहिती किंवा उत्तरे राजाला देत नाही किंवा राजा ह्यापासून अनभिध्य्न असतो असे नसून काय, केव्हा आणि कोणते प्रश्न आपल्या प्रधानमंत्र्याला विचारले पाहिजे हेच जर राजाला समजत नसेल तर तो एक उत्तम राजा होवूच शकत नाही आणि मग केवळ शिक्षा करून समस्या सुटणारी नसते

आश्विन सांघी ह्यांच्या "Chanakya's Chant" ह्या पुस्तकातील हा एक संवाद. चाणक्याची राजनीती आणि भारताची स्वातंत्रोत्तर राजनीती अतिशय चांगल्या पद्धतीने लेखकाने ह्या पुस्तकात विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी वाचावे असे हे एक पुस्तक.    विष्णुदत्त उर्फ चाणाक्क्याच्या वडिलांचा, चनक ह्यांचा मगध चा राजा धनानंद ह्याने वध केल्यानंतर, चाणाक्य मगध राज्ज्यातून पळून गांधार देशातील तक्षशीला विश्वविद्यालयात शिक्षणासाठी गेला (मगध म्हणजे आताचे बिहार राज्ज्य आणि गांधार, सध्याच्या काश्मीर च्या पश्चिमउत्तर चे एक राज्ज्य, मगध पासून १००० मैल दूर). तक्षशीला विश्वविद्यालयात अर्थशास्त्र तथा राज्ज्यशास्त्र ह्या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर काही काळ चाणाक्याने ह्याच  विश्वविद्यालयात अध्यापनाचे काम केले. ह्या कालावधीत त्यांच्या विध्यार्थ्यांनी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि चाणाक्याने दिलेली त्यांची उत्तरे:

प्र: प्रशासनामध्ये गोपनीयतेची गरज का असते?
: एक नागरिक म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक आपले काम प्रामाणिकपणे करता काय ह्याची तुम्हाला जाणीव नसेल किंवा खात्री नसेल, इतरांनी सांगितलेले तुम्हाला पटतही नसेल, आणि प्रशासनाच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल, अश्या परिस्थितीत प्रशासन चालविण्यासाठी मग गोपनीयता राखण्याची गरज असते

प्र:  आणीबाणी किंवा अराजकतेच्या परिस्थितीत राजावरील मानसिक दबाव त्याचा प्रधानमंत्री कश्याप्रकारे कमी करू शकतो
: कोणत्याही परिस्थितीत मानसिक दबावाखाली येणारा राजा हा कार्यक्षम राजाच असू शकत नाही.प्रत्येक प्रसंगाला यशस्वीरीत्या सामोरे जाण्याची कार्ययोजना निश्चित करण्याची तत्परता एका चांगल्या राजाने दाखविलीच पाहिजे.प्रधानमंत्री जर राजावरील मानसिक दबाव कमी करणारा असण्याची स्थिती निर्माण झाल्यास तोच प्रधानमंत्री राजाचे weak points हेरून राजाला सत्तेवरून केव्हाही दूर करू शक्तो

प्र: राजाने नेहमी फक्त खरेच बोलले पाहिजे काय
: उत्तम राजाला ह्याची गरजच भासावयास नको. राजा जे बोलतोय ते खरेच आहे एवढा जनतेचा विश्वास त्याने निर्माण करावयास हवा

प्र: प्रत्येक जनतेला स्वातंत्र्याची हमी देणारा उत्तम राजा कोणता?
: जनतेची गरज ओळखून ती पूर्ण करण्याची हमी देणारा राजा हा उत्तम राजा. एका गरीब उपाशी माणसाला त्यच्या दोन वेळच्या भोजनाची सोय करून हमी देणारा राजा हाच उत्तम राजा कारण त्या व्यक्ती साठी हीच त्याच्या स्वातंत्र्याची हमी ठरते

प्र: राजकारणातील विवाद मिटविण्यासाठी युद्ध हाच पर्याय आहे काय?
: राजकारण म्हणजे रक्तपाताशिवाय सुरु असणारे युद्ध आणि युद्ध म्हणजे रक्तपाताचे राजकारण

प्र: जनतेला त्यांचे कडून गोळा केलेल्या कराचा कश्याप्रकारे विनियोग होतो हे जाणून घेण्याचा हक्क नाही काय?
: देवालयातील दानपेटीत टाकलेल्या पैशाचे पुजारी काय करतो हे कोणी भक्त विचारतो काय? कारण त्याचा देवावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे करवसुलीतून निर्माण केलेल्या सुविधा जनतेच्या दृष्टीस येत असल्यास आणि त्यांचा राजावर पूर्ण विश्वास असल्यास हे जाणून घेण्याचा हक्क आहे हे त्यांच्या मनातही येत नाही

प्र: उत्तम प्रशासन हे तत्वांवर आधारित असावे काय?
: नक्कीच, प्रशासन हे तत्वनिष्ठच असवे. परंतु उत्तम प्रशासन म्हणजे तत्वांबद्धल बोलणे परंतु संपूर्णपणे त्याप्रमाणेच वर्तणूक करणे असे नाही

प्र: एखाद्या विषयवार चर्चा करण्यासाठी मंत्रीमंडळाने किती वेळ द्यावा?
: हे एका उत्तम राजाला ठरवता आले पाहिजे. योग्य उत्तर त्याला माहित असेल आणि त्यावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता राजात असेल तर नाहक चर्चा करत बसण्यापेक्षा असा विषय, विषयपत्रिकेवर भोजनाचे आधीचा शेवटचा विषय असावा आणि राजाचा निर्णय हाच सर्वानुमते निर्णय झाल्याचा आनंद सर्वाना व्हावा,अश्या तर्हेनेच राजाने चर्चा घडवून आणून विषय लवकर संपवावा

प्र: न्याय आणि कायद्याचे रक्षण करण्यासाठी राजाने युद्ध करावयास हवे काय?
: निश्चितच. परंतु हे युद्ध राजाच्या परराष्ट्रीय धोरणांच्या विपरीत नसल्यास

प्र: महत्वाच्या बाबी राजापासून लपवून ठेवणाऱ्या प्रधानमंत्र्याला काय शिक्षा करावी?
: प्रधानमंत्री योग्य माहिती किंवा उत्तरे राजाला देत नाही किंवा राजा ह्यापासून अनभिध्य्न असतो असे नसून काय, केव्हा आणि कोणते प्रश्न आपल्या प्रधानमंत्र्याला विचारले पाहिजे हेच जर राजाला समजत नसेल तर तो एक उत्तम राजा होवूच शकत नाही आणि मग केवळ शिक्षा करून समस्या सुटणारी नसते

आश्विन सांघी ह्यांच्या "Chanakya's Chant" ह्या पुस्तकातील हा एक संवाद. चाणक्याची राजनीती आणि भारताची स्वातंत्रोत्तर राजनीती अतिशय चांगल्या पद्धतीने लेखकाने ह्या पुस्तकात विशद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी वाचावे असे हे एक पुस्तक.