Saturday, December 11, 2010

पैसा गाठी - आरोग्यासाठी !


दोन वर्षांपूर्वी माझ्या आईची नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात angioplasty करण्यात आली.

काही गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे तिला ५-६ दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्या कालावधीत मी सतत रुग्णालयात
होतो. इतर रुग्णांच्या नातेवायीकांचे आपसातील संभाषण ऐकणे किंवा त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे हा त्या कालावधीतील महत्वाचा विरंगुळा. राजेश अगरवाल (नाव बदललेले) हा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अतिशय मध्यमवर्गीय आर्थिक
परिस्थितील गृहस्थ. ७५ वर्षाच्या आल्या आईला ह्याच रुग्णालयात दाखल केलेले. तपासणीअंती डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. राजेशचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, राजेश चे गावात एक छोटेसे किराण्याचे दुकान,
त्यचे लग्न झालेले आणी त्याला दोन मुले. अतिशय सर्वसाधारण अशी आर्थिक परिस्थिती. राजेशच्या आईला मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार, त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया ही अति जोखमीची. भारतीय संस्कृती, आई/वडिलांनी आपल्याला मोठ करताना, आपले शिक्षण करताना, त्यांची झालेली ओढाताण आपणाला अश्या परिस्थितीत प्रकर्षाने जाणवते आणी आपण
फार भावूक होतो. राजेश देखील एक मुलगा म्हणून त्याल अपवाद नव्हता. त्यामुळेच जोखीम असूनही हृदयाची शस्त्रक्रिया लगेच करावी लागेल आणी त्याकरिता साधारण २-३ लक्ष रुपये खर्च येईल हे डॉक्टरांनी सांगितल्या नंतर राजेशला हो म्हणण्याशिवाय
दुसरा पर्यायच नव्हता.

त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेनंतर दुपारी राजेश सारख्या, रुग्णांच्या इतर नातेवायीकांशी मी अनौपचारिक गप्पा करीत बसायचो. रुग्णालयातील २-३ लक्ष रुपयांचे बिल, आणी त्यानंतरही औषधांचा लागणारा खर्च, कसे काय राजेश करणार हा मनात सतत
येणारा विचार, आणी शेवटी विचारलेच राजेशला. आईच्या प्रकृतीविषयी आतिशय भावूक झालेला, परंतू ह्या सर्व खर्चाचा ताळमेळ कसा जमणार ह्याच विवंचनेत असणारा राजेश. तो म्हणाला, नातेवायीकांकडून, मित्राकडून उधारीने पैसे घेवून व्यवस्था
करीत आहो, गावाला गेल्यानंतर आमच्या मालकीची एक एकर शेती विकून १ ते दीडलाख लाख मिळतील, त्यातून काही लोकांची उधारी भागवेन, बाकी बघूया, चिंता तर आहेच. आणी अश्याच प्रकारची परिस्थिती इतर २-३ रुग्णांच्या नातेवायीकानी
सांगितलेली.

डोळे बंद करून विचार करीत बसलो. पुढील २-३ वर्षांचा, राजेश आणी इतर रुग्णांच्या नातेवायीकांचा चित्रपट डोळ्यासमोर येत होता, त्यांची सतत होणारी आर्थिक ओढाताण, विषम आर्थिक परिस्थिती, आणी एवढे पैसे खर्च करूनही ७५ वर्षांच्या अति जोखमीचे आजार असणारया आईचा हृदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर चार महिन्यानंतर दुर्दैवाने झालेला मृत्त्यू, आणी पुन्हा त्यानंतर झालेला खर्च. गरिबी रेषेच्या अगदी थोडे वर असणारी ही कुटुंब, ह्या एकाच आघाताने गरिबी रेषेच्या खाली गेलेली.
किती कालावधी लागेल ह्या कुटुंबाना ह्या आर्थिक परिस्थितून बाहेर येण्यासाठी? ह्या अश्या आर्थिक विवंचनेत राजेशच्या मुलांचे शिक्षण कसे काय होणार? अंगावर खरोखरच शाहरे आलेत हे सर्व भविष्य बघून. मनात विचार आला, ७५ वर्षांची आधीच अनेक आजार असलेली आई, ह्या स्थितीत राजेश ने शस्त्रक्रियेसाठी नकार द्यायला हवा होता. असा विचार किंवा बोलणे फार सोपे वाटते, परंतू आपणावर झालेले संस्कार, ठामपणे नकार खरोखरच शक्य आहे काय? उत्तर नाहीच येईल.

जीवनमर्यादा वाढत आहे. पुढील २० वर्षात सर्वसाधारणपणे एक व्यक्ती ९० वर्षांपर्यंत जगेल. ह्या वयात कर्करोग, हृदयरोग, अस्थिरोग, इतर दीर्घकालीन आजार आणी त्यांच्या उपचारांवर होणारा भरमसाठ खर्च. एका सर्वसाधारण कुटुंबाला न परवडणारा. मग ह्याकरिता आधीपासूनच रोगविमा किंवा आर्थिक तरतूद करून ठेवण्याची सवय, हा सर्वांच्याच आर्थिक योजनाचा एक अविभाज्ज्य घटक होण्याची तातडीची गरज ठरते आणी त्याकरिता सातत्याने समाज प्रबोधनाची गरज. अन्यथा राजेशच्या कुटुंबाची भविष्यातील आर्थिक परिस्थिती कोणत्याही मध्यम वर्गीय किंवा उच्चमध्यम वर्गीय कुटुंबात निर्माण होण्याची दाट शक्यता. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे, ज्यांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही, त्या पालकांना आणी त्यांच्या मुलांना दीर्घकालीन आजारांचा धोका आणी त्यावरील अपेक्षित खर्च लक्षात घेऊन सुरवातीपासूनच योग्य आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे ठरते. दोन दिवसांपूर्वी शाळेतील माझा वर्गमित्र भेटण्यास आला होता. प्राथमिक शाळेतील शिक्षक, नुकताच सेवानिवृत्त झालेला, त्याची पत्नी देखील प्राथमिक शाळेत शिक्षिका, अतिशय मध्यम आर्थिक परिस्थिती. राजेशची कहाणी त्याला सांगत होतो. तो म्हणला, " नौकरीच्या पहिल्या पगारापासून आपल्या भविष्यासाठी काही पैसे बाजूला काढून
ठेवायचे ठरविले. आम्ही दोघांनी सुरवातीला दरमहा ५० रुपयांची RD काढायला सुरवात केली, काही वर्षानंतर १०० रुपये आणी नंतर २०० रुपये अशी दरमहा पोस्टाची RD काढून पैसे साठवायला सुरवात केली. निर्णय घेतला, ह्या रकमेला कोणत्याही
परिस्थितीत नौकरी असेपर्यंत हात लावायचा नाही. पगारवाढ होताना मिळालेल्या रकमेतील १०% रकम बाजूला काढून
ठेवली. मुलाचे शिक्षण पूर्ण केले, तो आता नौकरी करतो, लग्नही झाले त्याचे. मुलीचेही लग्न झाले. आता म्हातारपणाची काहीच काळजी नाही. कोणावरही अवलंबून नाही. दुर्दैवाने काही गंभीर आजार झाला तरी आता मात्र पैश्याची अजिबात काळजी नाही".

काल सकाळी भाजी आणण्याकरिता बाजारात गेलो होतो. भाजी विकणारी मावशी ओळखीचीच होती. एक व्यक्ती
आली, मावशीने त्याला २० रुपये दिलेत, एका वहीत त्यने नोंद केली आणी निघून गेला. मावशीला विचारले, "कसले पैशे दिलेत?" मावशी म्हणाली," सोसायटीचा माणूस होता, रोज २० रुपये त्याच्या बँकेत टाकते. साहेब, आमचे दुखले खुपले तर आजारपणाचा खर्च आणी दुकानही बंद, हे पैसे आश्यावेळीच कामाला येतील". माझ्या मित्रासारखा किंवा मावशीसारखा विचार करून का नाही मध्यमवर्गीय कुटुंबाना देखील गंभीर आजारांच्या उपचारानाकरिता अश्याप्रकारे आर्थिक नियोजन करणे शक्य होईल काय?

7 comments:

  1. Good educational article for middle class families. Nandu

    ReplyDelete
  2. Dr.Uday Bodhankar:Congrats for a very useful Blog creation. We r proud of ur academic achievements & gre8 contribution in social field.

    ReplyDelete
  3. Thanks Aniket. Pl continue to post ur comments for me to further improve.

    ReplyDelete
  4. dr.dilip v. kaundinya MDDecember 30, 2010 at 1:13 AM

    MOST WONDERFUL EXPOSITION OF TODAY'S PROBLEMS.PRAJAPITA BRAHMA KUMARIS SAHAJ RAJAYOGA, FREE OF COST ADJUCT TO STANDARD MEDICINES GIVE REGRESSION OF CORONARY ARTERY DISEASE BY JUST 30MINUTES OF YOG DAILY.8500 CENTRES ALL OVER WORLD. FINDINGS PROVED IN ONGOING ABU HEALTHY HEART TRIAL,MORE 5000 CASES TO THIS DATE.TODAY TAKING THE HELP OF SUPREME SURGEON IS THE NEED OF THE TIME OTHERWISE MANY MORE FAMILIES SHALL BE DEVASTATED IN THE "NO USE" INTERVENTION WORTH SEVERAL LAKHS.
    75 IS THE RIPE AGE(SNAYAS). BUT TODAY EVERYBODY WANTS TO LIVE MORE. WHAT FOR?
    U HAVE WONDERFUL STOCK OF EXPERIENCE AND A BLOG TO SREAD THE MESSAGE.
    IF U WISH TO DO SOMETHING FRUITFUL, PLEASE APPRISE AS MANY AS POSSIBLE ABOUT THE SAHAJ YOG AND HEALTH.
    DR. DILIP V. KAUNDINYA

    ReplyDelete
  5. Sir,
    Your experiences are excellent lessons for the blog readers.
    R. P. Rokade

    ReplyDelete
  6. Yes, I can realise such a situation in many of middle class families. At the end of the day, its not just immotions but what is require to go for planned savings for such eventualitis.Nadar

    ReplyDelete