Saturday, December 4, 2010

कुटुंब नियोजनाकरिता "स्ट्रेपसील्स strategy"


संदेश वहनाच्या प्रक्रियेत संदेश देणारी व्यक्ती आणी सर्वांना समजेल अशी भाषा, ऐकणार्यांची त्या क्षणी असणारी समज आणी मानसिकता अतिशय महत्वाची असते. अन्यथा प्राप्त होणारा संदेश, ह्या संदेशातून समजणारा अर्थ आणी संदेशानुसार अपेक्षित कारवाही ह्यात थोडीशीही तफावत झाल्यास अर्थाचा अनर्थ घडू शकतो.

१९८० च्या दशकाच्या सुरवातीला महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात एक अतिशय तडफदार, कार्यकुशल आणी कोणत्याही परिस्थितीत नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे हा आग्रह असणारे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर कार्यरत होते. त्या कालावधीत महाराष्ट्र राज्याला सतत भारत सरकारतर्फे कुटुंब नियोजन कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल दरवर्षी बक्षीस मिळायचे. परंतु उद्दिष्ट साध्य करताना कामाची गुणवत्ता ह्याकडे मात्र दुर्लक्ष व्हायचे. ह्या सचिवांचे इतरत्र स्थानांतर झाल्यानंतर दुसरे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर रुजू झालेत. पहिल्या दिवसापासूनच निव्वळ आकड्यांपेक्षा कामाची गुणवत्ता जास्त महत्वाची आहे हा महत्वपूर्ण संदेश त्यांनी देण्यास सुरवात केली. साहजिकच काम एकदम कमी झाले. त्या वर्षी कुटुंब नियोजन कार्य अतिशय असमाधानकारक झाल्यामुळे त्यांनी काम वाढविण्यासाठी जानेवारी महिन्यात सर्व विभागीय उपसंचालकांची विशेष आढावा सभा बोलावली. शासकीय सेवेत सचिव म्हणजे सर्वोच्य अधिकारी, त्यातही IAS अधिकारी म्हणजे जणू काही आपण ह्या ग्रहावरील नाहीतच ह्याच तोऱ्यात सर्वांशी वागणारे. सर्व अधिकारी एका मानसिक तणावाखाली सभेस हजर होते. हे सचिव IAS होण्यापूर्वी मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेज मध्ये इंग्लिश लिटरेचर चे प्राध्यापक होते. उत्कृष्ट इंग्लिश बोलणारे, शिवाय व्यवस्थापन कलेचे उत्कृष्ट ज्ञान असणारे. संपूर्ण १-२ तासांच्या सभेत कामाची गुणवत्ता कशी वाढविली पाहिजे, आरोग्य कर्मचार्यांनी आपल्या लाभार्थिंशी कश्या तऱ्हेने गोड बोलून त्यांना कुटुंब नियोजनाचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, विम्याच्या प्रतिनिधी किंवा एखाद्या मिशनरी सारखे त्याच त्याच लाभार्थींकडे कसा सतत संपर्क साधला पाहिजे, ह्या विषयांवर अतिशय परिणामकारक इंग्लिश मध्ये भाषण दिले. सर्व अधिकारी मानसिक तणावाखाली, त्यांचे बरेच इंग्लिश शब्द किंवा व्यवस्थापन कलेशी अनुसरून असणारी वाक्य, बर्याच अधिकाऱ्यांना कळतच नव्हते. त्यांच्या संपूर्ण भाषणात एक वाक्य मात्र त्यांनी १० - १२ वेळा उच्चारले. ते म्हणत होते, "You should all adopt a strepsils strategy while motivating clients for family planning" . प्रत्येकाला ह्या भाषणाचा जसा काही अर्थ कळला तसा तशी त्याने आपली समजूत करून घेतली. ह्या भाषणानंतर "strepsil strategy " म्हणजे काय हे मी संचालकांना विचारले. ते म्हणले, " अरे, "strepsil strategy " म्हणजे सर्वांशी अतिशय गोड बोलणे आणी सौहार्दपूर्ण वर्तणूक सातत्याने ठेवणे".

सचिवांचे वाक्य म्हणजे सर्वांसाठी "ब्रम्ह वाक्य", त्यावर तत्काळ कार्यवाही तर झालीच पाहिजे. तो संगणकाचा जमाना नव्हता, कोणत्याही तत्काळ महत्वाच्या कामासाठी sevingrams पाठविले जायचे. सह संचालक कुटुंब नियोजन ह्यांनी तत्काळ सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना sevingrams पाठविले, " Most urgent - secretary has expressed his displeasure on poor family planning performance. Use strepsil strategy to complete annual target for the district "

ह्या sevingram चा अर्थ कोणाला कसा कळला आणी त्यांनी काय कार्यवाही केली माहित नाही. परंतू १ महिन्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात कामासाठी गेलेलो असताना जिल्हा आरोग्य अधिकार्याच्या कक्षात बसलो होतो. सहजच टेबल वरील कागदपत्रे चाळत होतो. आणी, जिल्हा आरोग्य अधिकार्याने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठविलेल्या एका परिपत्रकाची प्रत दिसली. परिपत्रकातील महत्वाचा मजकूर, " कुटुंब नियोजनाचे काम वाढविण्यासाठी आपल्या केंद्रास प्रत्येकी २००० strepsil च्या गोळ्या पाठवित आहो. कुटुंब नियोजनाच्या लाभार्थींचे मत परिवर्तन करण्यास मदत होण्यासाठी प्रत्येक लाभार्थीला १० strepsil च्या गोळ्यांचे पाकीट देण्यात यावेत" . थोड्या वेळाने जिल्हा आरोग्य अधिकारी आल्यानंतर त्यांना विचारले, ते म्हणले, होय, सह संचालक कुटुंब नियोजन ह्यांचेच निर्देश होते. मी तर तत्काळ 1 लक्ष गोळ्या विकत घेऊन त्याचे वाटप देखील केले. अतिशय हुशार अधिकारी ते, ह्या संदेशातून आपल्या फायद्याचे काय हे योग्य समजून त्यांनी तत्काळ कार्यवाही केली. डोक्यावर हात मारून घेतला मी. एका वाक्याच्या अर्थाचा कसा अनर्थ होऊ शकतो ह्याचे हे एक उदाहरण. माहित नाही, राज्यातील इतर जिल्ह्यातील अधिकार्यांनी ह्या sevingram चा अर्थ कसा समजून घेतला आणी काय कार्यवाही केली ती? मोठमोठी भारदस्त वाक्य वापरणे, कठीण कठीण शब्दांचा उपयोग करून समोरील श्रोत्यांवर आपला आपला प्रभाव पडणे म्हणजे काही परिणामकारक संदेशवहन नाही हे मात्र मला निश्चितच कळले.

7 comments:

  1. हे हे हे !! खतरनाक आहे ! आयला काय लोकं अर्थाचा अनर्थ करतात! बाय द वे त्यांच अ‍ॅन्युअल टारगेट पुर्ण झालं की नाही ते माहित नाही पण स्ट्रेप्सील्स वाल्यांचं नक्कीच झालं असेल !! :)

    ReplyDelete
  2. subhash: Prakash, I am testimony to this. Unbelievable but unfortunately true. Contune to write

    ReplyDelete
  3. A good case study worth including in communications training programs,yogesh

    ReplyDelete
  4. Excellant case study for training and very hilarious too

    ReplyDelete
  5. Sir Read the strpsil Story .U r gr 8. & such things though sound funny , are good lessons for ahead Dr Vandana Gandhi .

    ReplyDelete
  6. Godd example on what and how to communicate-Ashish

    ReplyDelete
  7. Narendara: This article should become part of any communication training

    ReplyDelete