Sunday, October 24, 2010

आणी तो नागवाच पळाला



१९८१ च्या फेब्रुवारी महिन्यातील तो प्रसंग. नागपूर जिल्ह्यातील काचारीसावांगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर मी कार्यरत होतो. काटोल ह्या तालुक्यातील रघवी ह्या समाजाचे प्राबल्य असणारया गावात विशेषतः पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांना अत्त्यल्प प्रतिसाद मिळत होता. ह्यां गावात कुटुंब नियोजन शिक्षणाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर मसली ह्या गावात पुरुष नसबंदी शिबीर आयोजित करण्याचा निर्णय झाला. बीडीओ, एसडीओ, पंचायत समिती सभापती आणी आमची चमू शिबिराचे दिवशी गावात पोहचलो. शाळेतील एका खोलीत नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी केलेली होती. एवढी सर्व मेहनत करूनही दुपारी एक

पुनर्जन्म


७०% पेक्षा जास्त आदिवासी असणारा गडचिरोली हा महाराष्ट्र राज्यातील एक दुर्गम आणी मागासलेला जिल्हा. अजून देखील ह्या आदिवासींमध्ये आरोग्य आणी आजार ह्या बाबत अनेक अंधश्रद्धा आणी भ्रामक समजुती आहेत. २५ वर्षांपूर्वी, गावातील वैदू म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचा प्रती-देव.

आरोग्य कर्मचार्यान्पेक्षाही त्यांचा वैदूवर जास्त विश्वास आणी वैदू च्या उपचारावर जास्त भरवसा. हि परिस्थिती