दोन वर्षांपूर्वी माझ्या आईची नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात angioplasty करण्यात आली.
काही गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे तिला ५-६ दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्या कालावधीत मी सतत रुग्णालयात
होतो. इतर रुग्णांच्या नातेवायीकांचे आपसातील संभाषण ऐकणे किंवा त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे हा त्या कालावधीतील महत्वाचा विरंगुळा. राजेश अगरवाल (नाव बदललेले) हा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अतिशय मध्यमवर्गीय आर्थिक
परिस्थितील गृहस्थ. ७५ वर्षाच्या आल्या आईला ह्याच रुग्णालयात दाखल केलेले. तपासणीअंती डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. राजेशचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, राजेश चे गावात एक छोटेसे किराण्याचे दुकान,
त्यचे लग्न झालेले आणी त्याला दोन मुले. अतिशय सर्वसाधारण अशी आर्थिक परिस्थिती. राजेशच्या आईला मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार, त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया


