Friday, February 8, 2013

ONE BILLION RISING



स्त्रियांवरील अत्त्याचार, लैंगिक अत्त्याचार, बलात्कार, रोज वर्तमानपत्रात वाचणाऱ्या, रेडिओवर ऐकणाऱ्या, दूरदर्शनवर बघणाऱ्या ह्या बातम्या, समाजाची एक विकृत अवस्था आणि मनात निर्माण होणारी अगतिकतेची, असहाय्यतेची स्थिती. पितृसत्ताक पद्धती, समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान, लैंगिक विषमता/असमानता, power relations, निर्णय घेण्यासाठी पोषक नसणारी स्त्रियांची स्थिती आणि पौरुषत्व दाखविण्याची दांभिकता आणि ह्या सर्वातून निर्माण होणारी विकृती म्हणजे "स्त्री हि फक्त एक भोगवस्तू" 

स्त्रियांवरील अत्त्याचारांचा एक दिवस तरी अंत होईल ह्या उद्धेशाने पुढाकार घेवून काही समाजसेवी संस्थांनी, महिलांनी १४ वर्षांपूर्वी एक चळवळ सुरु केली. जगातील १४० देशांमधील अनेक संस्था स्त्रियांवरील अत्त्याचारांच्या विरोधात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु तरी देखील आजची समाजाची स्थिती काय दर्शवते? आपली पत्नी, आई, बहिण, मुलगी ह्या समाजात निर्भयपणे वावरू शकते काय? संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार ह्या पृथ्वीवरील तीन पैकी एक स्त्री/मुलगी तिच्या जीवनकाळात  अत्त्याचाराचा,लैंगिक अत्त्याचाराचा,बलात्काराचा बळी ठरलेली असेल.  पृथ्वीवरील १०० कोटी स्त्रिया/मुली ह्या अत्त्याचारग्रस्त  असतील. 

 १४ फेब्रुवारी २०१३ रोजी, अत्त्याचारविरोधी दिनाच्या १५व्या वर्धापन दिनाचे निमित्ताने पृथ्वीवरील १०० कोटी महिलांना आवाहन करण्यात येते. " आता आमच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे,अत्त्याचार होऊ देणार नाही, मुकाट सहन करणार नाही, डोळ्यासमोर होणारा अत्त्याचार, आम्ही काय करणार हा विचार न करता त्याला प्रतिरोध करू आणि स्त्री शक्ती काय आहे हे साऱ्या जगाला दाखवून देवू", ह्या भावनेने आम्ही १०० कोटी महिला १४ फेब्रुवारी २०१३ रोजी घराच्या बाहेर निघून, छोट्या छोट्या गटांनी एकत्रित येउन आम्हाला जे काही शक्य होईल त्या कार्यक्रमांचे (गाणे, नाटक, पथनाटक,rallies, परिसंवाद, etc ) आयोजन करून " अत्त्याचाराचा अंत झालाच पाहिजे" ह्या वाक्याचे पडघम संपूर्ण पृथ्वीवर निनादून टाकू. 

स्त्रियांवरील अत्त्याचारांचा अंत व्हायचा असेल तर पुरुषांची सक्रिय भूमिका अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे, पुरुषांना देखील स्त्रियांच्या  सर्व जनजागृतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येते. 

आम्ही सर्व, " स्त्रियांवरील अत्त्याचारांचा अंत" झालाच पाहिजे ह्या मानसिकतेच्या बाजूने आहोत, आम्ही १४ फेब्रुवारी २०१३ रोजी आमचे घरातून, कार्यालयातून, आमचे दैनंदिन कार्य बाजूला सारून बाहेर निघू आणि आमचे जवळपास होणाऱ्या कार्यक्रमात सक्रियपणे  सहभागी होऊ, हि प्रतिज्ञा करण्याचे सर्वाना आवाहन करण्यात येते.

"ONE BILLION RISING", " विरोध करो, नाचो, उठो", " बोल के लब आझाद है तेरे (महिला हिंसा के खिलाप )" 

आपण आपले विचार, आपली संकल्पना facebook, twiteer,  ह्या सारख्या  माध्यमाद्वारे देखील व्यक्त करू शकता. स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्यासाठी, www.onebillionrising.org ह्या वेबसाईट चा उपयोग घ्या.    
  
मी एकटा काय करू शकतो, हि दुर्बलता झटकून टाका. इतरांनी काय करावे ह्यावर निव्वळ चर्चा न करताना, स्वतः पासून सुरवात करा. अत्त्याचारांचा अंत झाला नाही तर माझी पत्नी, आई, बहिण, मुलगी, ह्या समाजात सुरक्षित नाही हा विचार समोर ठेवून स्वतः पासून जन जागरणाच्या कार्याला सुरवात करा.