Friday, November 12, 2010

सी.ओ. आलेत .......

जिल्हा परिषद म्हणजे काय? जिल्हा परिषदेचे प्रशासन? ह्या सर्व बाबतीत संपूर्ण अनभिज्ञ असलेला मी, १३ जून १९७८ मध्ये नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर रुजू झालो. दुसऱ्याच दिवशी काटोल येथे पंचायत समितीच्या कुटुंब नियोजन आढावा सभेस उपस्थित राहावे लागले. नवीन अधिकारी, पदाधिकार्यांच्या ओळखी झाल्यात. बीडीओ, एसडीओ, तहसीलदार, पंचायत समिती सभापती, ही सर्व पदे, त्यांचे कार्य व अधिकार ह्याबाबत माहिती मिळाली. सभेला काटोल नगर परिषदेचे चीफ ऑफिसर (सी.ओ) श्री. पाल्हेवार देखील हजर होते. श्री. पाल्हेवार वर्ग - ३ चे अधिकारी तर मी मात्र वर्ग २ चा अधिकारी, ऐकून उगाच कॉलर टाइट झाली. श्री. पाल्हेवार ह्यांना सर्व सी.ओ. ह्या नावाने संबोधित होते.

२ दिवसानंतर दुपारी quarter मध्ये आराम करीत होते, शिपाई बोलवायला आला.
शिपाई: सर, सी.ओ. साहेब गावात ग्रामपंचायतच्या कार्यालयात आलेले आहेत आणी आपणला बोलवत आहेत.
माझ्यासमोर एका क्षणात काटोल नगर परिषदेचे सी.ओ. श्री. पाल्हेवार आलेत, ते वर्ग - ३ चे अधिकारी तर मी मात्र वर्ग २ चा अधिकारी, उगाच वृथा अभिमान जागृत झाला. मी म्हणालो, " जा, त्यांनाच माझ्या quarter वर घेऊन ये" . सी.ओ. मात्र आले नाहीत, परंतू दुसऱ्याच दिवशी बीडीओनी तत्काळ काटोल येथे बोलाविले आहे असा निरोप मिळाला. भेटल्यानंतर बीडीओ श्रीमती जोशी म्हणाल्या, " काय डॉक्टर, काल आम्ही सर्व सी.ओ. साहेबांसोबत कचारीसावंगा येथे ग्रामपंचायतच्या कार्यालयात आलेले होतो, तुम्हाला बोलविणे पाठविले तर तुम्हीच सी.ओ. साहेबाना भेटायला आपल्या घरी बोलावले?" मी अगदी सहज म्हणलो, " मग त्यात काय एवढे, पाल्हेवार साहेबाना मला भेटायला यायला काय झाल होत? " श्रीमती जोशी ह्यांनी कपाळावर हात मारून घेतला आणी म्हणल्या " अहो डॉक्टर, पाल्हेवार सी.ओ. नव्हे तर श्री. यशवंत भावे सी.ई.ओ. साहेब काल आले होते". "श्री. यशवंत भावे, आय. ए. एस. हे संपूर्ण नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, आणी तुमचे डी.एच.ओ डॉक्टर सपकाळ ह्यांचेही ते साहेब आहेत. फार नाराज झालेत ते तुमच्यावर काल आणी तुम्हाला तत्काळ नागपूरला भेटायला बोलावले आहे"

प्रकरणाचे गांभीर्य आता कुठे माझ्या लक्षात आले. नगर परिषदेचे चीफ ऑफिसर (सी.ओ) आणी जिल्हा परिषदेचे chief executive officer (सी.ई.ओ.) आणी दोघांसाठीही प्रचलितरित्या बोलला जाणारा शब्द म्हणजे "सी.ओ.", ह्या मधल्या silent " ई" केवढा मोठा गोंधळ निर्माण केला होता. दुसऱ्या दिवशी भावे साहेबाना नागपूरला जावून भेटलो. फार नाराज झालेत ते माझ्यावर. मला कामावर रुजू होवून फक्त ५ दिवस झालेत, जिल्हा परिषद म्हणजे काय, ह्या सर्व बाबतीत संपूर्ण अनभिज्ञ असलेला मी, आणी "सी.ओ.", "सी.ई.ओ." ह्या मधल्या silent " ई" मुळे झालेला गैरसमज, सर्व काही अगदी निरागसपणे त्यांना सांगितले. काहीच बोलले नाहीत ते, फोन उचलला आणी म्हणाले, " डॉक्टर सपकाळ, तुमच्या ह्या सर्व नवीन येणाऱ्या डॉक्टर मुलांना कामावर रुजू करून घेण्यापूर्वी प्रथम जिल्हा परिषदेचे प्रशासन तथा कार्यप्रणालीबद्धल एक दिवसांचे तरी तरी प्रशिक्षण आयोजित करा. तुमचे हे डॉक्टर मला नगर परिषदेचे सी.ओ समजले होते"

वापस जाते वेळी "सी.ओ" आणी " सी.ई.ओ" ह्या दोन पदांच्या अधिकाराची असणारी तफावत मला संपूर्ण समजलेली होती. ज्या ठिकाणी आपण नव्याने रुजू होतो, त्या संस्थेबद्दल, संस्थेची कार्यप्रणाली, सम्बद्धीत विविध अधिकारी, त्यांचे कार्य, ह्या सर्वांबाबत माहित असणे किती गरजेचे असते हे त्या क्षणी मला मिळालेली शिकवण. आणी "ध" चा "मा" केल्यामुळे कसा गोंधळ झाला असणार ह्याचेही गांभीर्य कळले.

काही वर्षांपूर्वी कामानिमित्त्याने दिल्लीला गेलेलो असताना एका कार्यक्रमात अचानकच श्री. भावे साहेबांची भेट झाली. त्यांच्या पत्नी, डॉक्टर सुधा भावे ह्यांनी भावे साहेबांची ओळख करून दिली. मी माझा उपरोक्त अनुभव आणी प्रसंग त्यांना सांगितला. हसले ते आणी म्हणाले, " मी आज देखील "सी.ओ" आहे बर! एका राष्ट्रीय स्थरावरील महामंडळाचे ते " सी.ई.ओ" होते त्या वेळी.

6 comments:

  1. A communication gap. Prakash, if you could recollect "strepsil strategy" and the incidence during impact evaluation of training in Bhandara district, do write articles on those experiences. Subhash

    ReplyDelete
  2. @All - Thanks a lot for the encouragement.
    Keep reading :)

    -Dr. Prakash Deo

    ReplyDelete
  3. Well must have been a very frightning experience when you came to know that you infact called up C.E.O. to meet you and not C.O. And that too in your very early days as a medical officer.
    Keep up the good work mama. Your articles are surely helping me as medical officer.

    ReplyDelete
  4. Sir,
    Due to communication gap we have to face some awkward situations. I can understand the tragedy if an IAS officer is at the other end. Your experiences are very good lessons for others. Keep up writing your experiences.

    R.P.Rokade

    ReplyDelete
  5. Great experience Sir, highlighting the need for the preplacement training.

    ReplyDelete
  6. This calls for importance of induction training for newly recruited staff to know the organization. Excellent experience: Narendra

    ReplyDelete