Sunday, November 21, 2010
शुक्रनाडी छेदन मराठी संगीत सन्दुक तमाशा
१९७८ ते १९८४ ह्या कालावधीत मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्य करीत होतो.
१९८० च्या दशकातील सुरवातीला पुरुष नसबंदी एक लोकप्रिय कुटुंब नियोजनाची पद्धत होती. काटोल येथील आठवडी बाजाराचे दिवशी ५०-६० नसबंदी शस्त्रक्रिया व्हायच्या. एक अतिशय गमतीशीर चित्र असायचे ते. १०० ते १५० माणसांची गर्दी, एक छोटासा शामियाना, ४-५ tables रांगेत मांडलेली (नोंदणी, फॉर्म भरणे, शेविंग साठी ठेवलेले समान, नसबंदी नंतर अनुदान वाटपाचे table, औषध वाटपाचे table), loudspeaker वर सुरु असलेल्या annoucements, कुटुंब नियोजनाची गाणी. शस्त्रक्रिया दालनात ३-४ tables वर झोपलेले लाभार्थी, operation च्या साहित्त्याचे drums, इतर साहित्त्य विखुरलेले, एकाच वेळी २-३ सुरु असणारया शस्त्रक्रिया, सिस्टर/attendants ह्यांचा आरडाओरडा, मधूनच table वरील लाभार्थींचे किंचाळणे, आणी हा सर्व गोंधळ पाहून पळून जाणारे काही लाभार्थी, त्यांचे मागे ओरडत धावणारे attendants. दोन मिनिटे डोळे बंद करा आणी हे सर्व चित्रण डोळ्यापुढे आणण्याचा प्रयत्न करा. ह्या सर्व प्रसंगास आम्ही म्हणायचो " शुक्रनाडी छेदन (vasectomy) मराठी संगीत सन्दुक तमाशा "
शस्त्रक्रियेनंतर एक antibiotics चे injection, infection होऊ नये म्हणून आणी pain होऊ नये म्हणून लाभार्थींना देण्यासाठी गोळ्यांच्या पुड्या. सोबत २०-३० निरोध (शस्त्रक्रियेनंतर प्रथम ३ महिने गर्भधारणा टाळण्यासाठी निरोध चा वापर आवश्यक असतो). लाभार्थींना tablets बाबत सिस्टर सर्व समजावून सांगायच्या, लाभार्थीही अनेक शंका विचारायचे (जेवणाआधी कि नंतर, थंड कि गरम पाण्यासोबत, पथ्य कोणकोणती?). पण निरोध बाबत, ना सिस्टर काही सांगायच्या ना लाभार्थी काही विचारायचे (निरोध बाबत सर्व माहितच आहे हा कदाचित आरोग्य कर्मचाऱ्यांचा समज).
मंगळवारी नसबंदी करणारे लाभार्थी पुढील मंगळवारी बाजाराच्या दिवशी टाके काढायला यायचे. सर्वांची तपासणी करण्यासाठी, टाके काढण्यासाठी डॉक्टर हजर असायचे. अश्याच एका मंगळवारी टाके काढल्यानंतर रामराव माझ्याकडे आलेत. ऐका पुढील संवाद:
मी: हं रामराव, टाके तर पूर्ण सुकले आहेत, तुमची तब्येत पण छान दिसते.
रामराव: व्हय साहेब, सर काही झ्याक हाई, पण जरासी तकलीफ झाली.
मी: काय झाले रामराव?
रामराव: साहेब, सिस्टर ने दिलेल्या साऱ्या गोळ्या बराबर ख्खाल्ल्या, पण ते पाकीटातल एक मोठ्या मुश्किलीने पाण्याघोटाशी गिळल. बाकी राहिलेले काही खाऊ शकलो नाही. हे घ्या तुमच, ठेवा तुमच्यापाशीच.
बाकी निरोध table वर आपटून रामराव निघून गेलेत. मी मात्र डोके धरून बसलो. निरोध खाण्यासाठी दिलेला आणी ते खाणारे रामराव सारखे काही लाभार्थी. विश्वास बसत नाही पण सत्य घटना. निरोध बाबत लाभार्थींना सर्व काही माहीतच आहे हे गृहीत धरून त्या बाबत आम्ही आरोग्य कर्मचारी त्याला काही सांगतच नाही. "गृहीत धरणे" हे कसे चुकीचे ठरू शकते ह्याचे हे उत्तम उदाहरण आणी एक नवीन शिकवण..............
Subscribe to:
Post Comments (Atom)
hard to believe. But excellent description of vasectomy camp. Shirish
ReplyDeleteVery funny! Would love to hear more stories from you.
ReplyDeleteha ha sahi aahey Pappa!! Your experiences are very unique and funny!!
ReplyDeleteIt is really hard to digest that how someone can eat it. It is really eye opening example to avoid 'taken as granted'.
ReplyDeleteVery funny and hilarious.
ReplyDeleteThose working in public health will appreciate this and believe this story, yes this happens and there are many more stories about condom, a person before sex putting condom on his thumb: Dr. Watawe
ReplyDeleteExcellent description of sterilization camp. Unfortunately the situation has not changed much in many backward states - Akash
ReplyDelete