Sunday, October 24, 2010

आणी तो नागवाच पळाला



१९८१ च्या फेब्रुवारी महिन्यातील तो प्रसंग. नागपूर जिल्ह्यातील काचारीसावांगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर मी कार्यरत होतो. काटोल ह्या तालुक्यातील रघवी ह्या समाजाचे प्राबल्य असणारया गावात विशेषतः पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांना अत्त्यल्प प्रतिसाद मिळत होता. ह्यां गावात कुटुंब नियोजन शिक्षणाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर मसली ह्या गावात पुरुष नसबंदी शिबीर आयोजित करण्याचा निर्णय झाला. बीडीओ, एसडीओ, पंचायत समिती सभापती आणी आमची चमू शिबिराचे दिवशी गावात पोहचलो. शाळेतील एका खोलीत नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी केलेली होती. एवढी सर्व मेहनत करूनही दुपारी एक वाजेपर्यंत फक्त ३ लाभार्थी शस्त्रक्रियेस तयार झालेले होते.

आवश्यक सर्व चाचण्या, तपासणीअंती रामरावची (नाव बदललेले) शस्त्रक्रियेसाठी निवड करून त्याला शस्त्रक्रिया दालनात पाठविण्यात आले. operation table वर झोपताना धोतर सोडून लाभार्थी स्वताच्या डोक्याखाली ठेवतात, ही प्रचलित
पद्धत. शस्त्रक्रियेची जागा निर्जंतुक करण्याची प्रक्रिया दूरू असताना रामराव धोतर डोक्याखाली घेऊन झोपला होता, आणी मी शस्त्रक्रियेकरिता हात धुण्यासाठी बाहेर आलो. स्पिरीट ने शस्त्रक्रियेची जागा निर्जंतुक करताना कदाचित खूप आग झाली असेल? माहित नाही नेमके काय झाले? रामराव खूप जोर जोराने ओरडायला लागला आणी टेबलवरून उठून तसाच बाहेर पाळायला लागला (नागवा, अंगावर फक्त एक बनियन). त्याला पळताना पाहून हात धुण्याचे सोडून, रामरावचे मागे मी आणी
माझ्या मागे बीडीओ, एसडीओ, सभापती आणी इतर अशी पाळण्याची शर्यत सुरु झाली. आणी, आमच्या समोरच रामरावने शाळेबाहेरील एका विहिरीत उडी मारली. आणी, त्याच क्षणी मला माझे हृदय बंद झाले असे वाटायला लागले. क्षणात समोरील चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. मनात म्हणालो, "देवा, मेलास तू आता, नौकरी तर गेलीच, जेल मधेही जाणार तू आता" .
धावतच विहिरीजवळ गेलो आणी विहिरीत वाकून पहिले. विहिरीतील मोटारपंपचा पाईप धरून रामराव पाण्यात उभा होता. त्याला जिवंत पाहून माझ्या जीवात जीव आला.

इतरही मंडळी तो पर्यंत विहिरीजवळ पोहचली होती. विहिरीतून रामराव ओरडत होता, "माझे धोतर खाली फेका विहिरीत, म्हणजे मी वर येतो". शाळेतून रामरावचे धोतर मागविले. विहिरीत ते फेकल्यानंतर धोतर गुंडाळून रामराव पाईपला धरून वर आला. रामराव म्हणाला, " साहेब, ते औषध एवढे झोंबायला लागले, आग आग व्हायला लागली,
काहीच सुचले नाही, धावत सुटलो, विचार केला, विहिरीच्या थंड पाण्याने जरा गार वाटेल". रामरावने मात्र आम्हा सर्वाना थंडगार केले. अर्थात त्या दिवशी एकही शस्त्रक्रिया झाली नाही हे काही वेगळ सांगायला नको.
अजूनही तो प्रसंग आठवला कि शाळेतून तसाच धावत सुटलेला आणी विहिरीत उडी मारणारा रामराव डोळ्यापुढे येतो. आता हा प्रसंग आठवल्यानंतर हसू येतं, परंतू त्या क्षणी माझी काय अवस्था झालेली असेल, आपण कल्पना करू शकता.

5 comments:

  1. hi story wachun mala "mandar-mama" aathavala...
    Tyani pan Police chya bhitine Wihirit udi marali hoti......

    sahi..................................

    ReplyDelete
  2. One of my vasectomy patient similarly ran out of the operation theatre went in side an adjoining room, bolted the room from inside and only opened the door at 6PM after confirming that the camp is over. Dr.T.Patil

    ReplyDelete
  3. Deva,most appropriate photo for the story. I can imagine your condition at that point of time. Continue writing

    ReplyDelete
  4. Unbelievable, such things also happen, I can imaging, one running naked and you running after him_ Madhav.

    ReplyDelete
  5. Akash-could be your life time experience, must be enjoying now, but I can emagine your situation at that time

    ReplyDelete