Sunday, October 24, 2010
पुनर्जन्म
७०% पेक्षा जास्त आदिवासी असणारा गडचिरोली हा महाराष्ट्र राज्यातील एक दुर्गम आणी मागासलेला जिल्हा. अजून देखील ह्या आदिवासींमध्ये आरोग्य आणी आजार ह्या बाबत अनेक अंधश्रद्धा आणी भ्रामक समजुती आहेत. २५ वर्षांपूर्वी, गावातील वैदू म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचा प्रती-देव.
आरोग्य कर्मचार्यान्पेक्षाही त्यांचा वैदूवर जास्त विश्वास आणी वैदू च्या उपचारावर जास्त भरवसा. हि परिस्थिती अजूनही काही तालुक्यातील गावांमध्ये दिसून येते. भामरागड तालुक्यातील पेरीमल्ली ह्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत १५-२० गावांमध्ये सप्टेंबर १९८६ मध्ये अतिसाराच्या साथीचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला होता. त्यावेळी मी
नागपूर येथे कार्य करीत होतो. डॉ. बी.एस. बनसोड जिल्हा आरोग्य अधिकारी ह्या पदावर गडचिरोली येथे कार्यरत होते. अतिसाराच्या साथीचे व्यवस्थापन करण्यासाठी माझी प्रतीनियुक्ती करण्यात आली. पेरीमल्ली येथे पोहोचल्या नंतर साथीची
सर्व माहिती घेतली, आरोग्य कर्मचार्यांना आवश्यक सूचना दिल्यात, कामाचे वाटप केले. दुसरया दिवशी मी, डॉ. बनसोड आणी एक पर्यवेक्षक, सर्व सामुग्री घेवून दौऱ्यावर निघालो.
एका गावात पोहचताना, गावाबाहेरील असणारया स्मशानभूमीवर १५-२० लोक जमलेले होते. दोन माणसे खड्डा खोदीत होती. आमची पहिली प्रतिक्रिया, " कोणीतरी अतिसाराने दगावलेला असणार". अधिक माहिती घेण्यासाठी पर्यवेक्षकाला पाठविले (त्याला माडिया ही स्थानिक बोलीभाषा अवगत होती), आम्ही गाडीतच बसून होतो. पर्यवेक्षक वापस आला आणी
त्याने सांगितले कि एक ४ वर्षांचा मुलगा अतिसाराने मरण पावलेला आहे. गावातील वैदूने उपचार केल्यानंतर त्याला मृत घोषित केलेले होते.
आम्ही गाडीतून उतरून घटनास्थळी गेलो. अति शुष्कता झालेले अतिसाराचे मुल सकृतदर्शनी अगदी मृतवतच
दिसते. परंतु मी जेव्हा मुलाला पहिले, मुल जिवंत होते. थोडे बाजूला जावून त्याबद्धल डॉ. बनसोड ह्यांना सांगितले आणी म्हणलो, "चला आपण उपचार सुरु करू या" , थोडावेळ डोळे बंद करून ही सर्व परिस्थिती समोर आणा, ज्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे अश्या वैदूने मुलाला मृत घोषित केलेले आहे, १५-२० लोक मुलाला दफन करण्याच्या तयारीत आहेत, गावकऱ्यांच्या धार्मिक अंधश्रद्धा, तुम्ही, त्यांचा अजिबात विश्वास नसलेले बाहेरचे, आणी आता तुम्ही सांगणार कि मुल मेलेले नाही आणी तुम्ही उपचार सुरु करणार आहात, काय प्रथम प्रतिक्रिया झालेली असेल तेथे जमलेल्या आदिवासींची" *
पर्यवेक्षक तर स्थानिक असल्यामुळे अधिकच घाबरलेला. दुर्दैवाने जर उपचार केल्यानंतरही आम्ही मुलाला वाचवू शकलो नाही तर, एका दृष्टीने आम्ही गावकऱ्यांच्या वैदुवरील विश्वासाला आवाहन केल्यासारखे होईल, आणी नंतर
हेच आदिवासी आमचे काहीही बरेवाईट करू शकतील. पर्यवेक्षक म्हणाला, "साहेब, चला येथून". मोठ्या धीराने आणी जोखीम पत्करून त्याच्या मार्फत गावकर्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. बरयाच चर्चे नंतर, उपचार करण्यासाठी त्यांनी रुकार दिला. मुलाला उचलून बाजूच्या झाडाखाली ठेवले, 'venesection' करून 'ringerlactate' ची ड्रीब सुरु केली. अर्ध्या तासातच मुलाने डोळे उघडले आणी हालचाल सुरु केली. नंतर आम्ही मुलाला गाडीत घेऊन पेरीमल्ली ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो, त्याला भरती केले, इतर उपचार सुरु केले, सिस्टर ला आवश्यक सूचना दिल्यात आणी आम्ही पुढील गावात भेटी देण्यासाठी निघालो. संध्याकाळी परत आलो तेव्हा मुलाला शुश्क्तेची कोणतीही लक्षणे नव्हती.
आम्ही त्या ठिकाणी १५ मिनिटे उशिरा पोहचलो असतो, अश्या प्रकारची जोखीम पत्करली नसती तर त्या मुलाला निश्चितच जिवंतच दफन केलेले असते. नंतरच्या सर्व भेटीत प्रथम स्मशानभूमी आणी नंतर गावात भेटी, असाच आमचा कार्यक्रम असायचा आणी तश्या सूचना सर्व आरोग्य कर्मचार्यानाही दिल्यात. विश्वास ठेवा, त्या ३ वर्षात, वैदुने मृत जाहीर केलेल्या आणी दफन करण्याच्या स्थितीत असणारया ४ मुलांचे जीव आम्ही वाचवू शकलो.
६ वर्षानंतर हेमलकसा येथील डॉक्टर प्रकाश आमटे ह्यांच्या लोक बिरादरी प्रकल्पातील आश्रम शाळेत एका पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आमची चमू घेवून शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलो होतो. कार्यक्रम
झाल्यानंतर एक आदिवासी आपल्या मुलाला घेवून मला भेटायला आला आणी म्हणला, " साहेब, ओळखले काय?, हाच तो माझा मुलगा, येथील आश्रम शाळेत शिकत आहे, ह्यालाच मृत समजून आम्ही दफन करायला निघालो होतो, पण तुम्ही त्याचा जीव वाचवला". क्षणात ६ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग डोळ्यापुढे आला.
परमेश्वरालाच माहित, अशी किती मुले त्या काळी वैदुने मृत घोषित केल्यामुळे जिवंतपणीच दफन केली असावीत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
hello mama..really nice article and awesome blog.. and this incidence in particular really touched my heart. well yes going against people's beliefs is really tough in practice and thats what i've noticed too here at my P.H.C...
ReplyDeleteAnd by the way wanted to share 1 thing with the followers of this blog.. the pic attached with this article has won a Pulitzer prize for best pic 1994.. the child is crawling towards United Nations Food Camp in some african tribal region and the vulture by his side is waiting for that child to die..
ReplyDeleteI know this story.....being u'r Room-mate for more than 4 Yrs.....I know most of these stories.... punha wachun mast watala........
ReplyDeleteKhirwadkar: angawar shahare aananara anubhav. Durdaivane to mulga mela asta tar deva kadachit tu aata jiwant disla nasta.
ReplyDeletenicely described...kaata aala Vachun
ReplyDeleteRuchi
hi mama
ReplyDeletevery touching.dolyat pani aala vachun.
Renu.
its so unfortunate that reliance on traditional healers still continues.This shows that health providers could not reach to the hearts of tribals.
ReplyDeleteWe never realized your potentials prakash, unbelievable experience and I am proud of you to make sincere efforts to save lives of children in Gadchiroli. What an experience and situation and really admire you of taking such a decision without thinking of wrath of tribals with their difficult to crack myths and misconceptions, Hemant
ReplyDeleteWe living in metro cities never imagine & believe ground realities in tribal areas.And the services you had provided deserves compliments - Akash
ReplyDelete