Friday, November 12, 2010

माझा पहिला परदेश प्रवास


माझा पहिला परदेश प्रवास - एक जीवघेणा अनुभव

"परंपरागत वैद्यक शास्त्राचा प्राथमिक आरोग्य सेवेत उपयोग" ह्या विषयावर अभ्यासाकरता जागतिक आरोग्य संघटनेने मला सप्टेंबर १९८९ मध्ये ५ महिन्यांची फेलोशिप प्रदान केली. ह्या फेलोशिप अंतर्गत मला अमेरिका, जपान, चीन, दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणी हॉंगकॉंग ह्या देशात भेटी देवून अभ्यास करावयाचा होता. माझ्यासोबत इतर ५ अधिकारी होते. माझा हा पहिलाच परदेश प्रवास. सप्टेंबर मध्ये सुरवातीला एक महिना शिकागो येथे इलिनिओस विश्वविध्यापिठात काम केल्यानंतर आम्ही ५ दिवसांकरिता वाशिंग्टन येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयात काम केले. वाशिंग्टन येथून पुढे तीन दिवस सीनसिनाती, तेथून सानफ्रान्सिस्को आणी सानफ्रान्सिस्को वरून ओसाका (जपान) येथे जावयाचे होते.


वाशिंग्टन येथून सीनसिनाती ला जाण्याकरिता आमचे तिकीट रीकन्फर्म करण्याकरिता २ दिवसाआधी आम्ही युनायटेड एयरलाइंस च्या कार्यालयात गेलोत. माझ्या इतर मित्रांची तिकीट रीकन्फर्म झालीत. परंतु संगणकाने माझे तिकीट रीकन्फर्म करण्यास नकार दिला. संदेश होता, " Deo P .R. D R holding passport No ............... issued By Bombay passport authority on ......... has been detained at Chicago airport on 8th September ( आम्ही शिकागो विमानतळावर उतरल्या नंतरच्या चौथ्या दिवशी) for further interrogation " हा संदेश वाचून आश्चर्य वाटले आणी घाबरलोही. युनायटेड एयरलाइंस च्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना मी वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला, शिकागो तसेच वाशिंग्टन येथील केलेल्या कामाचा अहवाल आणी प्रमाणपत्र दाखवले. तरीही त्यांनी माझे तिकीट रीकन्फर्म करण्यास असमर्थता दर्शवली आणी अधिक माहितीसाठी लुफ्तान्सा एयरलाइंस च्या कार्यालयात जाण्याची सूचना दिली (आमची सर्व तिकीट लुफ्तान्सा एयरलाइंस ने बुक केलेली होती). लुफ्तान्सा एयरलाइंस च्या कार्यालयात गेल्यानंतरही हाच संदेश मिळाला. ह्या सर्व परिस्थितीत भारतीय दूतावासच फक्त मदत करू शकेल असे सांगितले. ही शुक्रवार ची संध्याकाळ, शनिवारी माझे इतर सहकारी सीनसिनातीला जाण्यासाठी निघणार होते. भारतीय दूतावासाचे कार्यालय शनिवारी आणी रविवारी बंद असते ही माहिती मिळाली. शनिवारी माझे इतर सहकारी सीनसिनातीला जाण्यासाठी निघून गेलेत. शनिवारी सकाळी मलादेखील हॉटेल सोडावे लागले.

पहिलाच परदेश प्रवास, मदतीला कोणीही नाही, काय करावे काहीच कळत नव्हत. त्या वेळी माझी काय परिस्थिती झालेली असेल आपण कल्पना करू शकता. हॉटेल मधील सामान तेथेच ठेवले आणी दिवसभर इकडे तिकडे भटकत होतो. संध्याकाळी एका युवक वसतिगृहात एक रूम मिळाली. मी तर येथे आहो, मग माझ्या नावाचा पासपोर्ट असणारी व्यक्ती शिकागो येथे कशी असू शकेल? मनात नाही नाही ते विचार. वेड लागायची वेळ आली. अश्यावेळी नकारात्मक विचारच जास्त येतात, काय होईल आपले? रविवार विचारातच गेला. सोमवारी सकाळी भारतीय दूतावासाचे कार्यालयात गेलो. सुदैवाने एका कक्षासमोर " गोखले" ही पाटी दिसली. एक आशेचा किरण. गोखले साहेबाना भेटून माझी सर्व कथा सांगितली, सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्रे त्यांना दिलीत. श्री. गोखले माझ्यासाठी देवासारखे धावून आलेत. त्यांनी चारपाच ठिकाणी फोन केलेत, मुंबई च्या पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधला, माझ्या प्रमाणपत्रांचे FAX २-३ ठिकाणी पाठविले. दुपारी ३ वाजता त्यांनी मला लुफ्तान्सा एअरलाईन्स च्या नावाने मला पुढील प्रवास करण्यास अनुमती असल्याबाबतचे पत्र मला दिलेत. हे पत्र घेवून लुफ्तान्सा एयरलाइंस च्या कार्यालयात गेलो. मंगळवार सकाळ चे वाशिंगटन ते सानफ्रान्सिस्को आणी सानफ्रान्सिस्को ते ओसाका असे तिकीट मला मिळाले आणी ओसाका ला माझ्या इतर सहकार्यांसोबत पुढील कार्यक्रम सुरु झाला.

हे असं का झाल असावे, मी श्री. गोखले ह्यांना विचारले, ते म्हणले, " डॉक्टर, तुम्ही तुमचा पासपोर्ट शिकागो विमानतळावर कोणाला दिला होता काय?" खूप, विचार केल्यानंतर आठवले, म्हणालो "होय". शिकागो विमानतळावर सामानासाठी थांबलेलो असताना एक युनिफोर्म घातलेली व्यक्ती माझ्याजवळ आली आणी मला म्हणाली, " शिकागो येथील इलिनिओस विश्वविध्यापिठाचे वाहन घेण्यासाठी आलेले आहे", काही औपचारिकता पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्ती ने माझा पासपोर्ट मागितला. १५-२० मिनिटानंतर त्या व्यक्ती ने माझा पासपोर्ट मला परत केला. कोणत्याही परिस्थितीत आपला पासपोर्ट अनोळखी व्यक्तीस देवू नये, पासपोर्ट हा पैश्याच्या पाकीटापेक्षाही जास्त महत्वाचा आहे, हा सल्ला विसरलो, माझाच बावळटपणा, दुसरे काय. कोणीतरी माझ्या पासपोर्टचा गैरवापर केलेला असणार? खर काय घडले असावे, नंतर शोधण्याचा प्रयत्नही केला नाही.

त्यानंतर आतापर्यंत २५-३० वेळा परदेश प्रवास केला, परंतू, ते ३ दिवस आठवले कि अजूनही अंगावर काटा येतो. काहीही घडू शकले असते, ईश्वराचीच कृपा, आणी त्या क्षणी मला भेटलेले श्री. गोखले ईश्वराचाच अवतार असावेत.

8 comments:

  1. really a mindboggling experience. Each and every one going on foriegn trip should learn a lesson from this article

    ReplyDelete
  2. Yes Prakash I was with you on that day in Washington and a witness to this incidnece. I wonder how cool you could be in that situation even it was our first foriegn tour. Dr.Shastri

    ReplyDelete
  3. An experience which everybody should learn from. Definitely this will be helpful in future.
    :)

    ReplyDelete
  4. Me tumcha blog vachla. Tumcha anubhav nishchit kaante ananara hota. Tumchya dhairya ani sayamala salam. I'm proud of you.
    -Dushyant

    ReplyDelete
  5. That wasr eally a hair raising experience I can Imagine your plight at that point of time.
    Dr. Anand Kate

    ReplyDelete
  6. A real eye-opener and a great experience - just to ensure that we shall not take routine instruction casually.

    ReplyDelete
  7. horrible experience you make me jagrut when i will travel i will take care.

    ReplyDelete
  8. A breath taking experience, but you should have made efforts to find out the root cause - Nimish

    ReplyDelete