Wednesday, September 1, 2010

लहान होतो मी जेव्हा ...


लहान होतो मी जेव्हा, जग बहुतेक खूप मोठ होत...................
मला अजूनही आठवतो .......... घरापासून शाळेपर्यंतचा तो रस्ता........... काय काय नव्हते त्या रस्त्यावर ...........
ते मंगल कार्यालय, घरघरनारी ती पिठाची गिरणी, धोब्याचे, शिंप्याचे, किराण्याचे ते दुकान आणी प्रत्येक ठिकाणी थांबून शाळेत जाणारी आम्ही मुले. संघ बिल्डिंग चे ते मारुती चे देऊळ, त्यावर असणारया टीनांवरून घसरगुंडी खेळणारी ती मुले, आम्हीही थोडावेळ घसरगुंडीवर खेळायचो. मारुतीच्या देवळात नारळ फोडायला येणाऱ्या भाविकाची आणी एक तुकडा खायला मिळेल ह्या आशेने रोज देवळापाशी वाट पाहणारे आम्ही. बुधवार बाजारातील ती जुन्या पुस्तकांची दुकाने, शाळेसमोरील उकडलेली बोरे, बोरकूट, चुरण, icefruit विकणारी ती दुकाने........ आणी हे सर्व डोळ्यात साठवून, ह्या सर्वांचा आनंद घेत १०.३० ला घरून निघून ११.१५ ला शाळेत पोहचणारी आम्ही सर्व मित्र मंडळी.

आता त्याच रस्त्यावर आहेत mobile, इंटरनेट parlour, बाहेरून आत काय आहे हे न दिसणारी काचेची दरवाजे असलेली दुकाने, माणसे न दिसणारी बंद दरवाज्यांची घरे आणी flats ...... ज्या शाळेत जायला आम्हाला ४५ मिनिटे लागायची, त्याच रस्त्यावरून जुन्या घरून शाळेत जाताना आता मात्र वेळ लागतो फक्त १५ मिनिटांचाच .............. लहान होतो मी जेव्हा, जग बहुतेक खूप मोठ असावे, बहुतेक हे जग आता लहान होत असावे..........

लहान असताना बहुतेक संध्याकाळ लवकर होत नसावी ...................... हातात पतंगाची दोर धरून धावताना, cycle ची रेस, cycle वरून पडून पुन्हा उठून cycle चालविताना, संध्याकाळचे हे सर्व खळे खेळताना मिळणारा भरपूर वेळ......... आणी पुन्हा संध्याकाळीच घरी पोहचून हात/पाय धुवून देवाला नमस्कार करून, रामरक्षा म्हणून, जेवण करून आजीच्या गोष्टी ऐकत खेळून/थकून झोपताना, एवढ्या मोठ्या संध्याकाळची रात्र केव्हा होत होती कळतच नव्हती .......................
आता मात्र संध्याकाळ होतच नाही ... दिवस मावळतो आणी सरळ रात्रच होते. कामाच्या व्यापात संध्याकाळ झालेली कधी दिसतच नाही.............. बहुतेक जग जसे लहान होत आहे, वेळी हळूहळू कमी होत असावी ....... "वेळच मिळत नाही अलीकडे .... मोठी/शहाणी मानस म्हणूनच म्हणत असावीत".............

जेव्हा मी लहान होतो ..... मैत्री काय जीवापाड असायची ...... दिवसभर दंगामस्ती करीत मित्रांसोबत खेळणे, मित्रांच्या घरी जाऊन जे काही असेल ते आनंदाने एकत्रितपणे खाणे, घरच्या खाण्याच्या वस्तू चोरून खिशात भरून आणणे आणी मित्रांसोबत खाणे, मित्रांसोबत रडणे, हसणे, भांडणे, पुन्हा मैत्री करणे ..........
अशी ही निखळ मैत्री आता कुठे गेली? traffic सिग्नल वर दिसणाऱ्या तथाकथित मित्रांना हात दाखवून हाय म्हणणे आणी आपापल्या रस्त्यांनी पुढे निघणे .. आणी खूपच दिखाऊ मैत्री म्हणजे रात्री बार मध्ये बसने, शिळोप्याच्या गप्पा मारणे, दुसर्या दिवशी मात्र बार मध्ये गप्पा मारताना जो तथाकथित म्हणवणारा मित्र गैरहजर असेल त्याच्याच विरोधात गप्पांचा ओघ असणे....... होळी, दिवाळी, वाढदिवस, नवीन वर्षाचे फक्त sms पाठविणे.......... बहुतेक मोठ झाल्यामुळे आम्ही शहाणे झालोय? मैत्रीची नाती आता बदलत असावीत?

लहानपणी खेळ पण किती विचित्र असायचे ....... लापाछापी, धापाधापी, कांचे, भोवरे, गील्लीदांडू, सुरकांडी........ घामागुंग होऊन खेळतानाचे ते क्षण, त्या आठवणी अजूनही मेंदूने जपून ठेवलेल्या आहेत........
आता मात्र office, इंटरनेट, आणी TV वरील खेळ ...... लहानपणी खूप खेळल्यानंतरही दिवसभराच्या ह्या सर्व खेळांचे शेवटी वाटणारा उत्साह ... आता मात्र आयुष्याच्या दिवसभराच्या ह्या सर्व खेळांचे शेवटी सतत जाणवणारा निरुत्साह ...............
.......... जग लहान झालय, वेळ कमी झालीय, निरपेक्ष मैत्री काळाच्या उदरात गडप झालीय, बहुदा संपूर्ण जीवनच बदलत असाव? .......

" अंतिम ध्येय तर येथेच होत ...... संपूर्ण जीवन मात्र निघून गेले येथे येता येता" स्मशानभूमिबाहेर लिहिलेला हा फलक , बहुदा जीवनाचे खरे सत्य असावे.
.. जीवनाचा आज एक छोटासा क्षण
..... उद्याची शाश्वती कोणालाच नाही
....... येणारी उद्या ही फक्त स्वप्नवत आहे
.......... आशेच्या ह्या जीवनात फक्त पळापळ मात्र सुरूच आहे
............. कित वर्ष जगलो ह्याच विचार न करता जगावे कसे ह्याचा शोध मात्र अजून सुरूच आहे

6 comments:

  1. Lahanpan dega deva mhantat te agdi kharokhar aahe, niragspana ani aatach krutrimpana.

    ReplyDelete
  2. This is Manohar- Prakash, Yes, this is what is life. Last four lines really heart touching.

    ReplyDelete
  3. What a great concept. And your writing skills are just amezing. Subodh

    ReplyDelete
  4. i think this is called evolving, developing,etc etc. always there are pros and cons of evrything.if we gain something like technology, a fast track world where you can reach anyone in this world at the touch of a button , then certainly we have to gracefully accept the bad things that will come with it like people actually seeing less of each other and prefering to communcate through gadgets, people having no time to look aroung and appreciate the simple things in life, forgetting to feel , while trying to compete....... compete for what ---- i hope they themselves know. i nice writeup showing the difference between was and is.

    ReplyDelete
  5. Thanks Swikruti for such a wonderful and encouraging comments

    ReplyDelete
  6. Having read almost all your articles during last month and now trying to share my comments. I think you have really understood what is life and sharing through this blog. Congrats and continue to post your thoughts, hemant

    ReplyDelete