Monday, August 30, 2010

पहिले पाऊल


"पहिले पाऊल"
कोणाचाही आधार न घेता पहिले पाऊल टाकण्याचा हा प्रयत्नं. जीवनाच्या आतापर्यंतच्या प्रवासात मागे वळून ह्या प्रवासाच्या पाऊलवाटेच्या काही महत्वाच्या खुणा आजूनही स्मरणात साठवलेल्या आहेत त्या आपणापुढे मांडण्याचा हा एक प्रयत्नं. आतापर्यंतच्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना आज मी ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहो, जीवनात जे काही प्राप्त केलेले आहे ते केवळ अनाकलनीय वाटतंय. बरेचदा तर हे सत्य कि मृगजळ हा देखील प्रश्न पडतो? आतिशय विपरीत आर्थिक परिस्थितीत झालेले शिक्षण. वैद्यकीय महविद्यालयात शिक्षण घेत असताना तर cycle देखील नव्हती. First MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर hostel No 2 च्या जीण्याखालील अडगळीतील एक cycle उचलली, दुरुस्त केली आणि तीच cycle मी वापरीत होतो. Final ला असताना G .U .Deshpande ह्या माझ्या वर्गमित्राने चुकून ती cycle नेली. त्याला त्याचेच कोरलेले नाव cycle वर कुठेतरी दिसले. माझ्याच एका फास्ट फ्रेंड ची मी हि चोरलेली cycle आणि तिने मला पुढे ३-४ वर्षे दिलेली साथ.

आमचे वेळी postgraduate students ना stipend मिळत नव्हता. त्यामुळे नौकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. M .D. Pathology चे registration घेऊन महाराष्ट्र राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालो. परंतु, नौकरीतील भानगडी, भांडणे, मारामारी आणि त्यात guide ने सुरु केलेला त्रास. शेवटी सर्व अस्सयः झाला आणि नंतर pathology चे registration सोडून प्राथमिक आरोग्य केंद्रात medical ऑफिसर म्हणून रुजू झालो. ग्रामीण सेवेच्या आधारावर पुढे M.D. Paediatrics करण्याची इच्छा. पाच वर्ष्याच्या सेवेनंतर Paediatrics मध्ये डिप्लोमा मिळत होता, M.D. साठी अजून सहा महिने थांबावे लागेल असे अधिकार्यांनी सांगितले. थांबण्याचा निर्णय देखील घेतला. परंतु नंतरच्या सहा महिन्याच्या कालावधीत अश्या काही घटना घडल्यात, पुढील सेवेत असे काही अनुभव आलेत कि सहा महिन्यानंतर M.D. Paediatrics मिळत असूनही community medicine ह्या पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्राधान्य दिले. सर्वच "disconnect". Pathology ते Paediatrics ते community medicine आणि पुढे शासकीय सेवेत ह्याच संदर्भातील वाटचाल.

ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी आणि नंतरही शासकीय सेवेत आपल्याच समाज रचनेचे आलेले अनुभव. नौकरी करणारा मी एक निम्नवर्गीय आणि खाजगी practice करणारे, वैद्यकीय महविद्यालयात नौकरी करणारे माझेच वर्गमित्र म्हणजे उच्च वर्गीय. एक तुछ्य व्यक्ती म्हणून माझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन. ह्या सर्व पार्श्वभूमीवर वीस वर्षे केलेली शासकीय सेवा, आणि नंतर बारा वर्षांपासून WHO, UNFPA मध्ये करीत असलेली हि नौकरी. आणी नवल म्हणजे ह्या बारा वर्ष्याच्या कालावधीत ह्याच मित्रांच्या वर्तणुकीत जाणवलेला अमुलाग्र बदल, आतिशय सौहार्दपूर्ण अशी त्यांची वर्तणूक. अस का घडावं काहीच कळलेले नाही?

ह्या सर्व कालावधीत आलेले अनुभव म्हणजे माझ्या पुढील पाऊलवाटा. माझा एक मुलगा डॉक्टर झालाच पाहिजे ही जिद्द, त्यासाठी केलेले प्रयत्नं, कष्ट, त्याग आणी सतत समर्पक परामर्ष देणारी माझी आई, स्त्री रोग तज्ञ असणारी, परन्तु कुटुंबाकरता, मुलांच्या भवित्तव्यासाठी आणी माझ्या विकासासाठी स्वतःच्या विकासाशी compromise करणारी आणी माझ्यासाठी सतत भाग्यदायक ठरलेली माझी पत्नी, ह्या दोघांच्याही ऋणातून मी मुक्त होऊ इच्छित नाही. आज मी ज्या पदावर पोहोचलो आहो त्या करिता मला सतत मार्गदर्शन करणारे, मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे असणारे Dr. सुभाष साळुंके, महासंचालक आरोग्य सेवा, माझे एक आदर्श. आणी, माझा मित्र, Dr. अशोक आढाव, एक सकारात्मक दृष्टीकोन असणारा, शांतपणे ऐकण्याची कला असणारा, जीवन कसे जगावे, जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा उपभोगावा, आपले निर्णय इतरांवर न लादणारा, एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व. खूप काही शिकत आहे मी तुझ्यापासून अशोक.

"प्रकाशवाटा" म्हणजेच माझ्या जीवनातील पाऊल वाटा आणी आलेले अनुभव. पुढील पाऊल वाटा लिहिताना कदाचित त्यांचा निश्चित असा क्रम नसेल, किंव्हा एका विषयाचा दुसरयाशी संबद्ध देखील नसेल. बघूया, ह्या disconnected पाऊल वाटा.

14 comments:

  1. gr8 dad...hats off 2 u..m lucky 2 hv parents like u..n ths blog is gr8..thnx fr everything

    ReplyDelete
  2. khushalee : very very inspiring ......

    ReplyDelete
  3. I am really touched with your feelings about me. Nutan

    ReplyDelete
  4. I never thought that person of ur caliber had such a difficult way up.
    Unfortunately we had no contacts after passing MBBS. I am really proud of u and wish i had a similar strenght like u
    sanjiv

    ReplyDelete
  5. Anil said: never knew about this. hats off to you prakash on your hardwork and committments and all the best.

    ReplyDelete
  6. Hats off to You Bhauji
    Dushyant

    ReplyDelete
  7. You have arised as a winner from your hardships pappa, I feel proud of being your son...at this stage of your life you are still inspiring

    ReplyDelete
  8. Thanks Vikram, Infact your hundger for reading a lot and your writing skills has really motivated me to start this Blog.

    ReplyDelete
  9. Lachchhu: we were very close friends but u never shared with us. having overcome all odds and now reaching to such a coveted position, I am proud of you.

    ReplyDelete
  10. It is always very inspiring reading about a person who has gone through many hardships and has reached a state where he can be called as successful. one should always be proud of their background.beacuse the level of ones success is judged from the level of his background. ofcourse the things that our close ones do for us are non comparable. but there are many poeple in our lives whom we meet for a short time who are not related to us but in a small or big way contribute to our success. their names may not be worthy of a mention but somewhere we should always remember them and say a silent thanks for them .vv

    ReplyDelete
  11. Yes Swikruti, I fully agree with you> There are many people in my life who have contributed a lot and just saying thanks to them is not enough. I am indeed in obliged to them

    ReplyDelete
  12. I am Hemant and I know you from college days. Never imagined that you had gone through such stages and hats off to you for your commitments and hard work to reach to this level

    ReplyDelete
  13. Really admire your progress. In fact such foot prints in life help one to keep himself grounded. All the best. Prabhakar

    ReplyDelete
  14. Prakash, after reading this first article and then reading other articles, its unbelievable to see your progress and as a batch mate I am proud of you. Your writing skills are too good and each article communicates some take home message. All the best-Vinay

    ReplyDelete