Saturday, September 18, 2010

जगणे म्हणजे ...

जगणे म्हणजे ...

किशोरावस्था - शालेय जीवन:
४-५ मित्र, खूप मस्ती, खूप वेळ, खूप खेळ, वेळ मिळाल्यास अभ्यास, तासनतास गप्पा, खूप भांडणे पुन्हा मैत्री, जीवापाड मैत्री
४-५ मित्र, शाळेसमोरील ५ पैशात मिळणारे बोरकूट/बोरे, सर्वांनी मिळून मजेत खाणारे
४-५ मित्र, आजचा क्षण मनसोक्त आनंदात जगण्याचा, उद्याची चिंता नाही.

तारुण्य - महाविद्यालयीन जीवन:
४-५ मित्र... सर्वांच्या खिशात मिळून ४-५ रुपये, एका मित्राजवळ एक जुनाट स्कूटर, एक रिकामा रस्ता आणी भन्नाट भटकंती
होस्टेल ची रूम... रात्रीचे २, एका मित्राच्या घरून आलेला फराळाचा डब्बा आणी ५ मिनीटातच खावून फस्त झालेला.
१ तारीख झाल्यानंतर कोणाचे वडील/भाऊ प्रथम पैसे घेवून येतात, चातकासारखी वाट बघणे, पैसे मिळाल्यानंतर सर्वांची ३-४ दिवस चंगळ.
होस्टेल ची रूम... रात्रीचा १... " एकाच ते ... पुस्तक" आणी सर्वांचे सार्वजनिक वाचन.
५ तारखेनंतर उधारी... मित्रांची पूर्वीची उधारी परत केली नाही तरी पुन्हा उधारी मागताना न वाटणारा संकोच.
१ भिकार बायनोकुलर ... होस्टेल नंबर २ ची एक खिडकी ... ३-४ मित्र ... आणी २०० मीटर दूर असणारे लेडीज होस्टेल ... उघड्या खिडकीतून काही चमत्कार होईल ह्या आशेवर गप्पा मारत तासनतास बायनोकुलर मधून बघणे.
शेवटच्या क्षणी परीक्षेची तयारी, शेवटची रात्र, सोबत टेक्स्टबुक चा "घुटका" , मधेच धावत येवून उद्या येणारे प्रश्न सांगणारा एखादा मित्र, मग चौकात जाऊन चहा पिणे, थोडा अभ्यास आणी जास्त गप्पा.
परीक्षेची सकाळ... मारुतीचे देऊळ ... ४-५ मित्र... मारुतीला साकडे... आमच्यापेक्षा मारुतीलाच परीक्षेची जास्त काळजी.
परीक्षा संपल्याबरोबर लगेचच न चुकता सिनेमाची वारी.
१ मुलगी ... ३-४ आशिक... तासनतास चर्चा... भांडणे... पुन्हा मैत्री... ती मुलगी आपल्यावरच मरते ही खोटी आशा.
१ इनोसंट मुलगा, वर्गातील एक मुलगी त्याच्यावर मरते हे सतत त्याला पटवून देण्याचा प्रयत्न... त्याचा बळीचा बकरा करणे आणी त्यात मिळणारा आनंद.
१ प्रेमी मित्र आणी त्याची प्रेमिका ... त्यांचे किस्सेस आणी त्यातून मिळणारा आनंद.
मित्र, कॉलेज, होस्टेल, कॉलेजचा परिसर, मेडीकल चौक आणी सीताबर्डी ... एवढेच जग
४-५ मित्र, आजचा क्षण मनसोक्त आनंदात जगण्याचा, उद्याची चिंता नाही.

गृहस्थाश्रम:
भविष्यातील सुख/स्वप्ने, मुलांचे शिक्षण आणी त्यांचे भावितव्य्य... गाढवासारखी मेहनत.
मित्रांची प्रगती आणी ती गाठण्यासाठी ... कुतरओढ
जीवापाड प्रेम करणारे मित्र ह्यांची वानवा, हाय, हलो, टाटा, एस एम एस चा खेळ, कृत्रिम आपुलकी, मनातून असूया.
केवळ माझ्याच मुले सर्व काही सुरळीत सुरु आहे, मुले चांगली निघाली आहेत, "मी आणी फक्त मी", ह्या अहंभावातच जगण्याचे खोटे सुख.
आर्थिक समृध्दतेसाठी, सुख, समाधानाच्या मागे धावणारा न संपणारा कष्टदायक प्रवास.
सुख आणी इच्छा ह्यांची जीवनाच्या कुशीत शिरून सतत विचारणा ... आम्ही केव्हा पूर्ण होणार? परंतू पूर्ण होणारी इच्छा कधी नसतेच हे नकळलेले आणी उगाच धावाधाव.
फक्त उध्याचीच चिंता आणी काळजी, मनसोक्त आनंदात जगण्याचा आजचा क्षण हातून निसटून गेलेला.

आणी आता:
जुने मित्र, वेगवेगळी शहरे, वेगवेगळ्या जीवनपद्धती, त्यांना भेटावे, खूप गप्पा माराव्यात ही ओढ.
जुने जीवाभावाचे मित्र, जुन्या आठवणी, एक संध्याकाळ, २-३ पेग, आणी मनसोक्त गप्पा हीच अपेक्षा.
आयुष्याच्या संध्याकाळी जीवन मात्र जगावयाचे राहूनच गेले ही खंत, जीवनातील चुकलेल्या मार्गांचे आत्मपरीक्षण, चुकलेला मार्गावरून जीवनाच्या खऱ्या मार्गाचा न संपणारा शोध...
मनसोक्त आनंदात जगण्याचा आजचा क्षण शोधण्याचा प्रयत्न...

6 comments:

  1. You really rejuvinated nostalgic memories of our college life in medical college. Keep it up. Chandu

    ReplyDelete
  2. From: Dr. A.V.Dasarwar: Yes our college life was exactly what you described, Udhyachi chinta nahi.

    ReplyDelete
  3. All the articles are touching but realistic. An excellent combination of past memories and current realities, where the solutions continue to elude us. But at end not every problem has a solution but self awareness is equally important. This will touch few hearts and will change few minds. Keep it up!. I am very happy and proud. Wishing you all the best, \\ Sudhir

    ReplyDelete
  4. Your description of college life fits perfectly with our hostel life in medical college - Kishor

    ReplyDelete