Monday, September 6, 2010

सुसंवाद?


सुसंवाद?

ग्रामीण लोकांची बोलीभाषा न समजल्यास काय घडू शकते ह्याची ही काही उदाहरण:

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैध्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत असताना, समीर वझे माझ्या केंद्रात इंटर्नशिप करण्यासाठी आलेला एक तरुण. वडील उच्चपदस्थ अधिकारी, समीरचे convent नंतर चे मुंबई येथे college मधील शिक्षण. आयुष्यात खेडी म्हणजे काय असते प्रथमच बघणारा. प्रत्त्येक रुग्ण तपासल्यानंतर आवर्जून साबणाने स्वछ्य हात धुणारा.

माझ्या कक्षात सकाळी OPD च्या वेळी बसलो होतो. समीरही माझ्या बाजूला बसून रुग्ण बघत होता. समीर आणी एका रुग्णाचा हा संवाद:

समीर: हं ताई, काय होतंय आपणाला?

सखू: का सांगू जी, कसच्की व्हतय, येका रंगच लागते, जी पण मचलते, ४-५ दिस झाले, डोस्की न्हाई धुतली.

समीर: आहो ताई, आपली तक्रार आपण मला व्यवस्थितपणे सांगणार काय?

सखू: आजी सांगितल न्हव्हं, कसच्की व्हतय, ४-५ दिस झाले, डोस्की न्हाई धुतली

समीर: अगदी योग्य आहे ताई आपल. एवढे उन्हाळ्याचे दिवस, एवढी गर्मी आणी ४-५ दिवस झालेत आपण स्नान केलेले नाही, डोके धुतलेले नाही, सांगा बर आपणाला कसे चांगले वाटेल. घरी जा आणी थंड पाण्याने छान स्नान करा. आपणाला काहीही झालेले नाही.

सखू डोक्यावर हात मारून घेत: आता कसच सांगू बाई ह्या डागदरले

आणी, हा सर्व " सुसंवाद" मी ऐकत होतो आणी मनातल्यामनात हसत होतो. शेवटी समीरला सांगितले " अरे बाबा, ४-५ दिस झाले, डोस्की न्हाई धुतली, ह्याचा अर्थ तिला सांगायचे कि ४-५ दिवसांपूर्वी येणारी तिची मासिकपाळी च्क्लेली आहे"

डॉक्टर कितीही हुशार असलेत पण ते ज्या भागात काम करतात त्या भागातील बोलीभाषा समजत नसेल तर ते कसा साधणार रुग्णांशी सुसंवाद.

अजून एक अनुभव .......

OPD मध्ये बसलो असताना reproductive tract infection (प्रजनन संस्थेचे आजार) सम्बद्धी तक्रार घेऊन एक रुग्ण आली. आजाराबाबत विचारपूस केल्यानंतर कार्ड वर औषधी लिहून दिली. औषधी वाटप करताना compounder ने लिहून दिलेली औषधी कसी घ्यावीत हे समजावून सांगितले. vaginal tablets लिहिलेल्या होत्या. रात्री झोपण्यापूर्वी दररोज लघवीच्या जागी एक गोळी ठेवण्याची सूचना compounder ने दिली. ३-४ दिवसानंतर तीच रुग्ण पुन्हा परत आली, काहीच आराम झाला नाही असे म्हणाली. सिस्टर ला सांगितले, तिला तपासायला घ्या, मी येतोच. १० मिनिटात सिस्टर जोर जोरयाने हसत आल्यात. सिस्टर म्हणल्या " आपल्या सूचने प्रमाणे तो रोज लघवीच्या जागी एक गोळी ठेवत होती" मी म्हणलो " मग, त्यात एवढ हसण्यासारख काय झालय?" सिस्टर म्हणल्या, " सर, बाथरूम मध्ये लाघवी करताना ती रोज एक गोळी ठेवायची आणी लघवीच्या जागी गोळी ठेऊन नंतर त्यावर लाघवी करायची"
आपण ज्या सूचना रुग्णांना देतो त्या सर्व त्यांना समजतात हे गृहीत धरणे कसे चुकीचे ठरू शकते ही एक योग्य सुसंवाद शिकवण !

3 comments:

  1. Best example of language as an important communication barrier

    ReplyDelete
  2. yes, it is important to know local language and dilect for a medical professional

    ReplyDelete
  3. Rural internship would be a good opportunity to better understand local language and local dilects

    ReplyDelete