
सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षांच्या लेकीला तिची आई गर्भपातासाठी क्लिनिकमध्ये घेऊन आली. आईने दिलेले गर्भपाताचे कारणही सयुक्तिक होते. तिच्या लेकीचा नवरा त्यांच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा. त्याला दोन बहिणी आणि साहजिकच त्याच्यावर बहिणींच्या लग्नाची जबाबदारी. नजीकच्या भविष्यातील आर्थिक जबाबदारी लक्षात घेता तिने आणि तिच्या नवऱ्याने दोन वर्षे मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने हे नियोजन फसले आणि ती गर्भवती राहिली. या कहाणीच्या आधारे त्यांच्या मुलीचा वैद्यकीय गर्भपात करण्यास काहीच कायदेशीर अडचणी नव्हत्या; पण या साऱ्या चर्चेत मुलीची आईच फक्त बोलत होती आणि ती