Saturday, June 4, 2011

मनसरोवर - कैलाश परिक्रमा


मनसरोवर - कैलाश परिक्रमा
ब्रह्म देवाच्या मनात निर्माण झालेले आणी त्यांनी प्रत्यक्ष्यात साकार केलेले "मनसरोवर". चीन च्या तिबेट प्रांतातील कैलाश पर्वताच्या पायथ्याशी, समुद्र सपाटीपासून ४५८० मीटर उंचीवर असणारे गोड्या पाण्याचे मनसरोवर म्हणजे जगातील एक आश्चर्यच. ८८ किलोमीटर चा परीघ आणी ३०० फुट खोली, साधारणपणे गोलाकार असणारे आणी निळसर रंगाचे पाणी असणारे हे सरोवर. राजहंस ह्या पक्ष्यांचे निवासस्थान. सतलज, ब्रह्मपुत्रा आणी इतर महत्वाच्या नद्यांचे उगमस्थान. हिंदू, बौद्ध आणी जैन ह्या धर्मांचे एक धार्मिक स्थळ. आणी मनसरोवर पासून पुढे ५३ किलोमीटर ची कैलाश पर्वताची परिक्रमा. बहुतांशी पायी किंवा घोड्यावर ही परिक्रमा करावी लागते आणी ह्या परीक्रमेस ३ दिवस लागतात. परिक्रमा करताना ४५८० मीटर उंचीवरून पुढे ६५८० मीटर उंचीवर जावून पुन्हा मनसरोवरला परत आल्यानंतर ही परिक्रमा पूर्ण होते. कैलाश पर्वत म्हणजे भगवान शंकरांचे निवास्थान. अतिशय कठीण अशी ही परिक्रमा आणी ही परिक्रमा पूर्ण केल्यास कळत नकळत केलेल्या पापांची मुक्ती होते ही धारणा.

नागपूर येथील आम्ही ७५ मित्र मंडळींची चमू ८ जून पासून ह्या यात्रेला निघून २४ जून ला वापस येणार. त्यामुळे माझ्या ब्लॉग द्वारे ह्या कालावधीत आपणाशी संपर्क साधू शकणार नाही. परंतू परत आल्यानंतर यात्रेत आलेले अनुभव निश्चितच आपणाशी माझ्या ब्लॉग द्वारे share करणार. आपल्या सर्वांच्या शुभेछ्या सोबत घेवून यात्रेला प्रयाण करीत आहो.

5 comments:

  1. Happy Journey Mama, All the Best....Rahul Dehedkar

    ReplyDelete
  2. सहीच हो काका, तुम्ही कसे अप्लाय केले होते? म्हणजे त्याच्यासाठी कुमाऊं विकास मंडल कडे अप्लाय करावे लागत असेल न ती प्रोसिजर पण सांगा, मेडिकल फ़िट्नेस वगैरे बद्दल टेक्निकली अन डॉक्टर म्हणुन टीप्स पण द्याल प्लीज.

    ReplyDelete
  3. Applying through Government of India requires lot of formalities to be completed. Moreover this route is very difficult. We went from Kathmandu (Nepal. Shortly posting details on the blog

    ReplyDelete
  4. Awaiting your experiences and also please post photographs- Naresh wrote

    ReplyDelete
  5. Cn you please share contact details of agency in Nepal conducting this tour? Ratnakar

    ReplyDelete