१९७८ ते १९८४ ह्या कालावधीत मी नागपूर जिल्ह्यातील कचारीसावंगा ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्य करीत होतो.
१९८० च्या दशकातील सुरवातीला पुरुष नसबंदी एक लोकप्रिय कुटुंब नियोजनाची पद्धत होती. काटोल येथील आठवडी बाजाराचे दिवशी ५०-६० नसबंदी शस्त्रक्रिया व्हायच्या. एक अतिशय गमतीशीर चित्र असायचे ते. १०० ते १५० माणसांची गर्दी, एक छोटासा शामियाना, ४-५ tables रांगेत मांडलेली (नोंदणी, फॉर्म भरणे, शेविंग साठी ठेवलेले समान, नसबंदी नंतर अनुदान वाटपाचे table, औषध वाटपाचे table), loudspeaker वर सुरु असलेल्या annoucements, कुटुंब नियोजनाची गाणी. शस्त्रक्रिया दालनात ३-४ tables वर झोपलेले लाभार्थी, operation च्या साहित्त्याचे drums, इतर साहित्त्य विखुरलेले, एकाच वेळी २-३ सुरु असणारया शस्त्रक्रिया, सिस्टर/attendants ह्यांचा आरडाओरडा,