
१९८१ च्या फेब्रुवारी महिन्यातील तो प्रसंग. नागपूर जिल्ह्यातील काचारीसावांगा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी ह्या पदावर मी कार्यरत होतो. काटोल ह्या तालुक्यातील रघवी ह्या समाजाचे प्राबल्य असणारया गावात विशेषतः पुरुष नसबंदी शस्त्रक्रियांना अत्त्यल्प प्रतिसाद मिळत होता. ह्यां गावात कुटुंब नियोजन शिक्षणाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्यानंतर मसली ह्या गावात पुरुष नसबंदी शिबीर आयोजित करण्याचा निर्णय झाला. बीडीओ, एसडीओ, पंचायत समिती सभापती आणी आमची चमू शिबिराचे दिवशी गावात पोहचलो. शाळेतील एका खोलीत नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सर्व पूर्वतयारी केलेली होती. एवढी सर्व मेहनत करूनही दुपारी एक