Wednesday, March 20, 2013

देव आहे?




हिमालय पर्वताच्या एका शिखरावरील चौकीवर posting झाल्यामुळे १५ शिपाई मेजर साहेबांसोबत base camp  पासून निघाले होते. ३ महिन्यासाठी ह्या शिखरावरील चौकीवर त्यांचे posting झाले होते. ह्या चौकीवर असणारा troop त्यांची आतुरतेने वाट बघत होता, कारण हा नवीन  troop तेथे पोहचल्यानंतर त्यांना  base camp  वर परत येता  येणार होते. त्यातील काही रजेवर जाण्याची, आपल्या कुटुंबियांना भेटण्याची स्वप्न बघत आशेने नवीन येणाऱ्या  troop वाट बघत होते, आपले कार्य आपण चोख बजावले ह्याचा आनंदही त्यांचे चेहऱ्यावर होता. 

base camp  पासून पर्वताच्या शिखरावरील चौकीवर पर्वतारोहण करून पोहचण्याचा मार्ग अतिशय कठीण आणि जिकरीचा होता. सकळी निघाल्यानंतर हा troop दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोहोचणार होता. रस्त्यातील जीवघेणी थंडी आणि मधूनच होणारा हिमवर्षाव, त्यांचे मार्गक्रमणात बाधा आणत होता. रात्रीचे दोन वाजले होते, थंडीने सर्व गारठले होते, "आता ह्या वेळी गरम चहा मिळाला तर किती बरे होईल", मेजरच्या मनात सुखद विचार आला. परंतु ही सुखद  इच्छा पूर्ण होणे शक्य नाही हे देखील मेजर साहेबाना ठाऊक होते. ह्याच विपरीत परिस्थितीत चढाई करताना एक तासाने त्यांना एक टपरीवजा झोपडे दिसले. तेथे कदाचित चहा मिळेल ह्या आशेने जवळ गेल्यानंतर त्या झोपडीला कुलूप दिसले. झोपडीचा मालक शोधावा तर जवळपास कोठेही एखादेतरी घरही दिसत नव्हते. "Boys, चहा मिळायची आशा आता सोडा, थोडावेळ विश्रांती घेऊन पुन्हा चढायीला निघू या!", मेजर साहेबांचे फर्मान. " सर, हे निश्चितच चहाचे दुकान दिसतंय, आपण हे कुलूप तोडून चहा बनवू काय?" एका शिपायाची विनंती. 

सर्व शिपाई आतिशय थकलेले पाहून आणि आता सर्वाना हुशारी/तरतरी येण्याकरिता चहाची निश्चितच आवश्यकता आहे हे जाणून,  बुद्धीला न पटणारे होते तरी मेजर साहेबांनी कुलूप तोडण्याचे आदेश दिलेत. कुलूप तोडले गेले. सर्व खूप भाग्यशाली होते, दुकानात चहाचे सर्व साहित्य आणि बिस्किटांची काही पाकिटे देखील उपलब्ध होती. चहा करून सर्वांनी गरमागरम चहा पिला, सोबत काही बिस्किटे देखील खाल्लीत. ताजेतवाने होवून पुढील मार्गक्रमणासाठी सर्व तयार झालेत. मेजर साहेब मात्र चिंतेत होते, आपण हे चूक केलेत हे त्यांना जाणवत होते. चहाचे पैसे घेण्यासाठी देखील आजूबाजूला कोणीच नव्हते. आपण शिस्तबद्ध सैनिक आहोत, कोणी चोर नव्हेत हे मेजर साहेबाना जाणवत होते.  त्यांनी खिश्यातून १००० रुपयांची नोट काढली, टेबलवरील साखरेच्या डब्याखाली सहज दिसेल अश्या रीतीने ठेवली आणि नंतर झोपडीचे दर बंद करून पुढील मार्गक्रमण सुरु केले.   

चौकीवर पोहचल्यानंतर, दिवस, आठवडे, महिने निघून गेलेत, त्यांना नेमून दिलेले कार्य त्यांनी आगदी प्रामाणिकपणे यशस्वी केले. तीन महिन्यानंतर दुसरा troop त्यांना relieve करण्यासाठी आला आणि ते  base camp ला परत निघाले. परत येताना रस्त्यातील त्या झोपडीपाशी थांबले, झोपडीचे दर उघडे होते. एक गरीब म्हातारा झोपडीत बसला होता. १५-१६ लोक झोपडीकडे येताना पाहून आता किमान १५-१६ चहाची विक्री होऊन पैसे मिळतील ह्या आशेने त्याचा चेहरा उजळला. चहा पिल्यानंतर गप्पांचा ओघ सुरु झाला, बराच वेळ गप्पा मारल्यानंतर म्हातारा झोपडीतील एका कोपऱ्यात जावून नमाज पढू लागला. नमाज पूर्ण झाल्यानंतर गप्पांचा ओघ " देव आहे काय? देवावरील विश्वास" ह्या विषयाकडे वळला. सैनिकच ते, देव नाहीच, नुसते एक थोतांड आहे, हे आपले म्हणणे म्हाताऱ्याला पटवून सांगत होते. शांतपणे ऐकल्यानंतर म्हातारा म्हणला " देव निश्चितच आहे, मला अनुभव आलेला आहे, मी हे सिद्ध करू शकतो",  म्हातार्याने त्याचा अनुभव कथन केला. " नाहक संशय घेवून तीन महिन्यांपुर्वी माझ्या एकुलत्याएक मुलाला काही अतिरेक्यांनी खूप मारहाण केली. माहित झाल्यानंतर लगेच दुकान बंद करून मुलाला दवाखान्यात नेले. औषधांसाठी काहीच पैसे नव्हते, त्यामुळे औषधाधोपचाराविनाच मुलाला घरी आणले. आता काय करावेत ह्याच विवंचनेत होतो, शेजाऱ्यांना उधार पैसे मागितले, पण अतिरेक्यांच्या  धाकामुळे कोणीही पैसे देण्यास तयार झाले नाहीत. रात्रभर विचार करून तळमळत होतो. सकाळी दुकानांत गेलो आणि बघतो काय तर देवाने दुकानाचे कुलूप उघडले होते आणि साखरेच्या बरणीखाली १००० रुपयांची नोट ठेवून तो निघून गेला होता. आता तुम्ही सर्व मला सांगा देव आहे कि नाही?" "देवावरील विश्वास", सर्व सैनिक मेजर साहेबांकडे बघत होते, आणि डोळ्यांनीच कोणीही काहीही बोलायचे नाही ही सूचना मेजर साहेबांनी केली.

चहाचे पैसे म्हाताऱ्याला दिलेत, सर्वांचे डोळे पाणावले होते,मेजर साहेबांनी म्हाताऱ्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणले, " होय बाबा, देव आहे आणि निश्चितच त्याचे अस्तित्व आहे". मनात विचार केला, आपल्या पैकी कोणीही, कधीही, कोणासाठीतरी "देव" होऊ शकतो.            


Friday, February 8, 2013

ONE BILLION RISING



स्त्रियांवरील अत्त्याचार, लैंगिक अत्त्याचार, बलात्कार, रोज वर्तमानपत्रात वाचणाऱ्या, रेडिओवर ऐकणाऱ्या, दूरदर्शनवर बघणाऱ्या ह्या बातम्या, समाजाची एक विकृत अवस्था आणि मनात निर्माण होणारी अगतिकतेची, असहाय्यतेची स्थिती. पितृसत्ताक पद्धती, समाजातील स्त्रियांचे दुय्यम स्थान, लैंगिक विषमता/असमानता, power relations, निर्णय घेण्यासाठी पोषक नसणारी स्त्रियांची स्थिती आणि पौरुषत्व दाखविण्याची दांभिकता आणि ह्या सर्वातून निर्माण होणारी विकृती म्हणजे "स्त्री हि फक्त एक भोगवस्तू" 

स्त्रियांवरील अत्त्याचारांचा एक दिवस तरी अंत होईल ह्या उद्धेशाने पुढाकार घेवून काही समाजसेवी संस्थांनी, महिलांनी १४ वर्षांपूर्वी एक चळवळ सुरु केली. जगातील १४० देशांमधील अनेक संस्था स्त्रियांवरील अत्त्याचारांच्या विरोधात जनजागृती निर्माण करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु तरी देखील आजची समाजाची स्थिती काय दर्शवते? आपली पत्नी, आई, बहिण, मुलगी ह्या समाजात निर्भयपणे वावरू शकते काय? संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार ह्या पृथ्वीवरील तीन पैकी एक स्त्री/मुलगी तिच्या जीवनकाळात  अत्त्याचाराचा,लैंगिक अत्त्याचाराचा,बलात्काराचा बळी ठरलेली असेल.  पृथ्वीवरील १०० कोटी स्त्रिया/मुली ह्या अत्त्याचारग्रस्त  असतील. 

 १४ फेब्रुवारी २०१३ रोजी, अत्त्याचारविरोधी दिनाच्या १५व्या वर्धापन दिनाचे निमित्ताने पृथ्वीवरील १०० कोटी महिलांना आवाहन करण्यात येते. " आता आमच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे,अत्त्याचार होऊ देणार नाही, मुकाट सहन करणार नाही, डोळ्यासमोर होणारा अत्त्याचार, आम्ही काय करणार हा विचार न करता त्याला प्रतिरोध करू आणि स्त्री शक्ती काय आहे हे साऱ्या जगाला दाखवून देवू", ह्या भावनेने आम्ही १०० कोटी महिला १४ फेब्रुवारी २०१३ रोजी घराच्या बाहेर निघून, छोट्या छोट्या गटांनी एकत्रित येउन आम्हाला जे काही शक्य होईल त्या कार्यक्रमांचे (गाणे, नाटक, पथनाटक,rallies, परिसंवाद, etc ) आयोजन करून " अत्त्याचाराचा अंत झालाच पाहिजे" ह्या वाक्याचे पडघम संपूर्ण पृथ्वीवर निनादून टाकू. 

स्त्रियांवरील अत्त्याचारांचा अंत व्हायचा असेल तर पुरुषांची सक्रिय भूमिका अतिशय महत्वाची आहे, त्यामुळे, पुरुषांना देखील स्त्रियांच्या  सर्व जनजागृतीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येते. 

आम्ही सर्व, " स्त्रियांवरील अत्त्याचारांचा अंत" झालाच पाहिजे ह्या मानसिकतेच्या बाजूने आहोत, आम्ही १४ फेब्रुवारी २०१३ रोजी आमचे घरातून, कार्यालयातून, आमचे दैनंदिन कार्य बाजूला सारून बाहेर निघू आणि आमचे जवळपास होणाऱ्या कार्यक्रमात सक्रियपणे  सहभागी होऊ, हि प्रतिज्ञा करण्याचे सर्वाना आवाहन करण्यात येते.

"ONE BILLION RISING", " विरोध करो, नाचो, उठो", " बोल के लब आझाद है तेरे (महिला हिंसा के खिलाप )" 

आपण आपले विचार, आपली संकल्पना facebook, twiteer,  ह्या सारख्या  माध्यमाद्वारे देखील व्यक्त करू शकता. स्वाक्षरी अभियानात सहभागी होण्यासाठी, www.onebillionrising.org ह्या वेबसाईट चा उपयोग घ्या.    
  
मी एकटा काय करू शकतो, हि दुर्बलता झटकून टाका. इतरांनी काय करावे ह्यावर निव्वळ चर्चा न करताना, स्वतः पासून सुरवात करा. अत्त्याचारांचा अंत झाला नाही तर माझी पत्नी, आई, बहिण, मुलगी, ह्या समाजात सुरक्षित नाही हा विचार समोर ठेवून स्वतः पासून जन जागरणाच्या कार्याला सुरवात करा.           

Thursday, January 24, 2013

मला घटस्फोट हवाय


त्या दिवशी रात्री घरी परत आलो तेंव्हा  माझ्या पत्नी, जेन सोबत  भोजन करताना मी तिचा  हात हातात घेतला आणि म्हणलो, " मला, तुला काही सांगावयाचे आहे " ती शांतपणे काही न बोलता जेवत होती, पुन्हा मला तिच्या वेदना तिच्या डोळ्यातून जाणवत होत्या. विषयाला कशी सुरवात करावी मला समजत नव्हते. परंतु मी जो विचार करीत होतो तो तर मला तिला सांगावयाचाच होता. मी अतिशय शांतपणे म्हणलो, " ला घटस्फोट हवाय". माझ्या ह्या शब्दांनी काहीही विचलित न होता तो अगदी शांतपणे म्हणली, "कां ?" 

मी तिच्या प्रश्नांचे उत्तर न देत काहीही न बोलता शांत राहिलो. त्यामुळे तिचा राग अनावर झाला. टेबलवरील  चमचे जोराने फेकून अतिशय त्राग्याने ती  माझ्यावर ओरडली, " तू माणूस नाहीस". त्या रात्री आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही, रात्रभर ती रडत होती. मला कळत होते कि तिला जाणून घ्यावयाचे आहे कि आपल्या वैवाहिक आयुष्यात असे काय घडले कि तू म्हणतोय  " मला घटस्फोट हवाय". मी तिला काहीच समाधानकारक उत्तर देवू शकत नव्हतो. मी मेरीवर प्रेम करावयाला लागलो होतो आणि त्यामुळेच जेनवर आता माझे काहीच प्रेम राहिलेले नाही ह्याचा मला ठाम विश्वास झाला होता. त्या क्षणी मला जेनची फक्त दया येत होती.

एका अपराधी भावनेने मी घटस्फोटाची सर्व कागदपत्र तयार केलीत. घर, कार, सर्व संपत्तीचा ८०% वाटा, कंपनी चे ८०% शेअर्स जेन च्या नावे , घटस्फोटाच्या कागदपत्रात ह्या सर्वांचा उल्लेख केला.जेनने हि  कागदपत्र पहिली, वाचली आणि तत्काळ फाडून टाकली. १० वर्ष ज्या जेन सोबत मी राहत होतो ती मला आता अनोळखी वाटावयास लागली. परंतु मेरीवर माझे एवढे प्रेम होतो कि मी आता कुठलीच माघार घ्यावयास तयार नव्हतो. आणी माझ्या अपेक्षेप्रमाणे जेन थोड्या वेळातच जोरजोराने रडावयास लागली. पण, ह्या सर्वांचा आता माझ्यावर काहीच परिणाम होणारा नव्हता, कारण मेरीवर माझे इतके प्रेम जडले होते की त्यापुढे जेनच्या कोणत्याही भावना जाणून घेण्याच्या मी मनस्थितीतच नव्हतो. 

दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी घरी आलो तेव्हा जेन टेबलवर काही तरी लिहित होती. संपूर्ण दिवस मेरीसोबत अतिशय आनंदाने गेल्यामुळे मी काहीही न बोलता झोपावयास निघून गेलो. सकाळी जागे झालो तेव्हाही जेन टेबलवर काहीतरी लिहीतच होती. सकाळी तिने घटस्फोटाच्या तिच्या अटी माझ्यासमोर मांड्ल्या. तिला माझ्याकडून काहीच नको होते, फक्त घटस्फोटासाठी एक महिन्याचा कालवधी तिला माझ्याकडून हवा होता. आणि ह्या  कालावधीत दोघांनीही अगदी नेहमीप्रमाणे आयुषः जगावयाचे. अगदी साधे कारण, पुढील एक महिन्यात मुलाची परीक्षा होती आणि घटस्फोटाच्या कालवधीत अभ्यासापासून कोणत्याही परिस्थितीत तिला आपल्या मुलाला विचलित होऊ द्यावयाचे नव्हते. मी ह्या अटींना तत्काळ मान्यता दिली. तिला अजून काही सांगावयाचे होते. ती म्हणली, "आठवं, लग्नाच्या दिवशी रात्री किती प्रेमाने तू मला उचलून आपल्या bedroom मध्ये घेवून गेला होतास?". ती म्हणली, "पुढील एक महिन्यात रोज तू मला सकाळी तसेच  उचलून आपल्या bedroom  मधून खाली hall मध्ये आणावयाचे आहे".  मला वाटले, "हि वेडी तर झाली नाही ना?". म्हणलो, "चला एकाच तर महिना आहे, हिची हि मुर्खासारखी अट देखील मान्य करू या!"

दुसऱ्या दिवशी मेरीला हि अट सांगितली. जेनच्या मूर्खपणाला ती हसली आणि म्हणली, "आता जेनने काहीही नाटक केली तरी आपले लग्न हे होणारच" 

जेनचे आणि माझे ह्या एक महिन्याच्या कालवधीत शारीरिक संबध असण्याचा प्रश्नच नव्हता, आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी सकाळी   bedroom  मधून  खाली hall मध्ये जेनीला उचलून आणताना दोघानाही संकोच वाटत होता. पण, हे दृष्य बघून मुलाला मात्र फार आनंद झाला आणि तो आनंदाने टाळ्या वाजवू लागला. उचलून आणताना डोळे बंद करून ती म्हणली, ' कोणत्याही परिस्थितीत मुलाला आपल्या घटस्फोटाविषयी काहीही बोलू नकोस". दुसऱ्या दिवशी उचलून आणताना हा संकोच थोडा कमी झाल्यासारखे मलाच वाटत होते. तिच्या Blouse चा सुगंध मनाला थोडा सुखावितही होता. मनात विचार आला, " किती दिवसांपासून मी जेनकडे काळजीपूर्वक बघितले देखील नाही. ती आता काही तरुण राहिली नव्हती, चेहऱ्यावर थोड्या सुरकुत्या दिसत होत्या, काळ्या केसांमधून काही पांढरे केस डोकावीत होते. ह्या दहा वर्षात आपल्या संसारासाठी किती सोसले तिने, किती झिजली ती! आणि मी तिला काय देवू शकलो, मी तिच्यासाठी काय केलेत?". 

५व्या-६व्या दिवशी उचलून आणताना एक अनामिक जवळीक, आपुलकीची संवेदना मनात निर्माण व्हायला लागली. खरच ह्या दहा वर्षात मी तिच्या साठी काय केले? ह्याचा विचार करून एक अपराधीपणाची भावना निर्माण व्हायला लागली. पुढील काही दिवसांत तर हि भावना  अधिकाधिक दृढ व्हायला लागली आणि उचलून नेण्याच्या भावनेनेच रोज माझ्या मनात उत्साह आणि एक वेगळीच संवेदना निर्माण व्हायला लागली, रोज सकाळी त्या क्षणाची मी  वाट बघू लागलो. रोज, ती पण सकाळी व्यवस्तीत तयार होवून उत्साहित दिसायला लागली. रोज कोणते कपडे घालवेत ह्या विषयी मी  देखील तिला उत्साहाने सांगू लागलो. "ती म्हणली, अशात काय झाले समजतच नाही , माझे सर्व कपडे मलाच अतिशय ढिले व्हायला लागले. आणि, अचानकच मला देखील हे जाणवले, ती फार रोड झालेली होती, कमी झालेले वजन तिला उचलून आणताना मला देखील प्रकर्षाने जाणवत होते. तिच्यासाठी काय परिस्थिती मी निर्माण केली ह्या भावनेने मला माझीच लाज वाटायला लागली. 

त्या दिवशी तर उचलून खाली आणताना मी नकळतच तिच्या कपाळावरून,केसांतून हळुवारपणे हात फिरवीत होतो. मुलाने हे बघून तोही आनंदाने टाळ्या वाजवीत होता. तिनेदेखील तिचे हात हळुवारपणे आणि अतिशय विश्वासाने माझ्या मानेभोवती गुरफटून घेतले होते. उचलून खाली ठेवताना दोघांनीही एकमेकांना नकळतच मिठीत घेतले. आणि मला क्षणात लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा तिला उचलून नेतानाच तो सुखद प्रसंग आठवला.    

तिच्या कमी होणाऱ्या वजनाची मात्र आता मला काळजी वाटायला लागली. शेवटच्या दिवशी तर तिला उचलल्यानंतर, उद्यापासून काय? ह्या विचाराने मला पुढे पाऊल देखील टाकणे अशक्य होत होते. मुलगा शाळेत गेला होता. मी तिला घट्ट मिठीत घेतले, प्रेमाने तिच्या शरीरावर हात फिरविला आणि म्हणलो," खरच, माझ्या ह्या अश्या वागण्यामुळे आपण एकमेकांपासून दूर गेलेलो होतो, मी तुझ्या भावना कधी समजू शकलोच नाही". क्षणात पुन्हा मेरीचा चेहरा डोळ्यासमोर आला, खूप विचार केल्यास कदाचित आपला निर्णय बदलेल म्हणून लगेच तिच्या पासून दूर होवून ऑफिस मध्ये गेलो.

 ऑफिस मध्ये जाताना जेनचेच विचार राहून राहून मनात येत होते. ऑफिस मध्ये गेल्याबरोबर हसूनमेरीने, हसून माझे स्वागत केले आणि प्रेमळपणे गळ्याभोवती हात टाकला. मी म्हणलो, "मेरी, माफ कर मला, पण मला आता जेन पासून घटस्फोट घेता येणार नाही. मला आता खऱ्या प्रेमाचा अर्थ समजलेला आहे, आणि माझी चूकही लक्षात आलेली". मेरी ने फाडकन माझ्या गालावर एक थापड मारली, खूप शिव्या दिल्यात आणि रडत रडत जोराने दार बंद करून निघून गेली. संध्याकाळी घरी जाताना एक सुंदर पुष्पगुछ  विकत घेतला, विकणारी ती मुलगी म्हणली, ह्या कार्डवर काय लिहू? मी हसलो आणि कार्डवर लिहिले,  " आता फक्त मृत्त्युच आपणाला वेगळे करू शकेल, तो पर्यंत रोज मी तुला असेच उचलून आपल्या bedroom  मधून खाली hall मध्ये आणेल, खूप प्रेम करेन आणि माझ्या चुकांची पूर्ण भरपाई करून तुला सुखात ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन".

अतिशय उत्साहाने, आनंदाने हातात  पुष्पगुछ घेवून घरी आलो, धावतच bedroom मध्ये गेलो, तर काय बघतोय, माझी जेन बेडवर शांतपणे झोपलेली होती, ती मरण पावलेली होती. जेन अनेक महिन्यांपासून cancer शी झागडीत होती. मी माझ्या कामात आणि मेरीच्या प्रेमात इतका गुरफटलेलो होतो कि मी जेनकडे आणि तिच्या आजाराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलेले होते. ती मरणार हे तिला माहित होत, आणि घटस्फोटाचा विपरीत परिणाम मुलाच्या भविष्यावर होऊ नये म्हणूनच तिने एक महिन्याचा कालावधी मागितला होता. निदान, एक प्रेमळ पती हेच चित्र तिला मुलाच्या मनात ठसवावयाचे होते.

जीवनातील भौतिक सुख हि महत्वाची असतात, पण पती-पत्नी ने एकमेकांना समजून घेणे, एकरूप होवून जीवन जगणे अति महत्वाचे नाही काय? प्रेम हा जीवनातील सर्वात महत्वाचा खजिना आहे, आपल्या भागीदाराकडून काही अपेक्षा करताना, आपण स्वतः शी प्रामाणिक आहोत का?, आपल्या भागीदाराला समजून घेतोय का?, आणि त्याप्रमाणे जाणीवपूर्वक काही बदल स्वतः मध्ये करतोय का? एक साधी गोष्ट, पण सर्वाना खूप अंतर्मुख करणारी आणि खूप शिकवून जाणारी (रुची कुंटे देव हिने Face Book टाकलेल्या गोष्टीचा मराठी अनुवाद )           

Wednesday, December 12, 2012

Facebook


कधीतरी अगदी फावला वेळ असल्यास Facebook उघडून पाहणारा मी. गेल्या एक महिन्यात मात्र केव्हाही Facebook उघडले कि त्यात एकाच मैत्रिणीचे रोज रतीब  टाकल्यासारखे किमान ६०-७० posts. आणि हे browse करताना फावला वेळ निघून जायचा किंवा काही महत्वाचे interesting posts पहायचे राहून जावयाचे. आणि रात्री १२-- वाजता देखील अगदी नियमित केलेले हे  posts. शेवटी ह्या  मैत्रिणीला "unfriend " करावेच  लागले

मुंबईतील " Universal Addiction Clinic ". ७० वर्षाच्या एका महिलेची  Clinic मध्ये entry. Clinic मध्ये नीरनिराळे कक्ष. Heroin Addiction Department, Alcohol Addiction Department, Smoaking Addiction Department (SAD ), Facebook Addiction Department (FAD). सर्वात जास्त गर्दी FAD मध्ये. waiting room मध्ये ३५-४० लोक बसलेले. ही महिला देखील ह्याच कक्षात जाऊन बसली. बसलेल्या सर्वांची डोकी blackberry किंवा iphone मध्ये  घातलेली. २० वर्षांचा एक तरुण, चेहरा दोन्ही हातांनी झाकून जमिनीवर पालथा पडलेला आणि एक स्त्री त्याची सांत्वना करीत असलेली, "बाळा, असे काही करू नकोस, सर्व काही ठीक होईल".  बाळाची आपल्याच मनाशी बडबड सुरु, "मला समझतच नाही, माझे updates, like करण्या सारखे असतानाही एकही मित्राने like चे button press केले नाही". हे अस कधीपासून झालंय, त्या महिलेने विचारले? " मिनिटांपासून", बाळाचे उत्तर, जणू काही - महिने झाल्यासारखे

त्या ७० वर्षाच्या महिलेच्या नावाचा पुकारा झाला आणि ती आत गेली. समीर दिघे हे FAD counselor. हसून स्वागत केल्यानंतर, general चर्चा झाल्यानंतर समीर ने विचारले, "तर मग,Mrs. Arora, हे अस कधीपासून सुरु झालंय?"

Mrs. Arora: ह्याला सर्वस्वी माझा नातू जबाबदार आहे. Facebook वर join होण्यासाठी त्याने मला invitation पाठविले. मी हे आधी कधीच ऐकले नव्हते, नेहमीच माझा चेहरा पुस्तकात दडलेला असावयाचा, हे काही तरी नवीन आहे, आणि नंतर त्यानेच माझे  Facebook account  देखील open करून दिले, म्हणले चला, एक नवीनच अनुभव घ्यावयाला काय हरकत आहे!

समीर: किती वेळ तुम्ही  Facebook वर असता

Mrs. Arora: विशेष नाही पण १४-१५ वेळा तरी Facebook open करते आणि प्रत्येक वेळी ३०-३५ मिनिटे तरी बघते. रात्री देखील रोज - वेळा Facebook open करावे लागते, माझे काही मित्र अमेरिकेत आणि इतर देशात देखील आहेत ना! त्यांची posts बघावयास नकोत का?. माझ्या नवऱ्याला मात्र हे काहीच आवडत नाही, तो म्हणतो, " friendship is a precious treasure and it should not  be outsourced", मूर्ख, बावळट, मागासलेला कुठला!

समीर: Facebook बाबत तुम्हाला काय आवडते?

Mrs. Arora: खऱ्या  अर्थाने मला आता जीवन जगत असल्यासारखे वाटतंय. खऱ्या दुनियेत माझ्या फक्त - मैत्रिणी आहेत, पण  Facebook वर मात्र आता माझे ७१२ मित्र/मैत्रिणी आहेत. Juan Colos हा देखील माझा मित्र आहे

समीरहा Juan Colos कोण?

Mrs. Arora: मला देखील माहित नाही, पण फार प्रसिद्ध व्यक्ती असावी, कारण त्याचे ४००० पेक्षा जास्त friends आहेत. Facebook मुळे खूप लोकांशी मी जुळू शकले. आगदी शाळेतले काही वर्गबंधू देखील आता माझे Facebook friends आहेत. गेल्या ५०-६० वर्षात त्यांचेशी काहीही संपर्क नव्हता. त्यांचे आता  Facebook वरील फोटो पाहून, ते आता काय करतात, त्यांचे posts वाचून खूप excited आणि तरुण झाल्यासारखं वाटतंय. ते कुठे फिरावयास जातात, कोणती movies पाहतात, काल कोणत्या hotel मध्ये गेले, हॉटेल च्या मेनू चे फोटो, त्यांच्या नातवांचे फोटो,toilet papers ते कुठे ठेवतात, आणि कितीतरी, बघून, वाचून खूप उत्साह वाटतो. आणि, , मी त्यांचेसोबत  Facebook वर games देखील खेळते. "Mafia Wars" हा माझा आवडता game. I am always Hitman.

समीर: ह्या पैकी काही तुम्हाला प्रत्यक्ष भेटत नाहीत काय?

Mrs. Arora: नाही हो! Facebook वर तर आता भेटणे फारच सोपं झालंय. त्यामुळे गरजच वाटत नाही. आणि, मग,प्रत्यक्ष भेटण्यासाठी आकर्षक कपडे घालणे, makeup करणे, perfume लावणे, आपण आकर्षक दिसावे म्हणून नियमित व्यायाम करणे, ह्या सर्वांची आता गरजच राहिली नाही.   Facebook वर सर्व किती सुंदर आणि आकर्षक दिसतात नाही! कारण प्रत्येकाने आपला एक सुंदर profile picture निवडलेला असतो ना! मी तर माझा सुंदर, आकर्षक फोटो शोधण्यासाठी मी तर - दिवस घालवले, शेवटी beauty parlour मध्ये गेले.

समीर: नंतर एक सुंदर फोटो काढून घेतला असेल नाही?

Mrs. Arora: नाही हो! त्या  beauty parlour मधील एका सुंदर मुलीचा फोटो काढला आणि तो माझ्या profile picture वर upload केला

समीर: तुमच्या मित्रांनी त्या फोटोवर काही comments केल्या नाहीत काय?कारण तुमचे वय आणि फोटो ह्यातील तफावत कोण्या मित्राच्या लक्षात आली नाही काय?

Mrs. Arora: अहो! तीच तर गम्मत आहे. मी स्वतःला इतके सुंदर, आकर्षक आणि fit ठेवण्यासाठी मी काय आहार घेते, कोणता व्यायाम करते, कोणत्या parlour मध्ये जाते, तळवलकर जिम, ह्या सर्वांबाबत मी Facebook वर उपलोड करत असते ना!

समीर: पण, Facebook मुळे  काही समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याचे निराकरण करण्यासाठी ह्या केंद्रात जाणे गरजेचे आहे असे तुम्हला का आणि केव्हापासुन वाटावयास लागले?

Mrs. Arora: ह्या रविवारी, रात्री मी नेहमीप्रमाणेच  Facebook वर होते. टेबल वर माझ्या नवऱ्याने लिहिलेली चिट्ठी दिसली. "मी दिवसांपूर्वीच घर सोडून निघून गेलेलो असेन, तुझ्या माहिती साठी फक्त" अहो  एका घरात राहताना फक्त एक महिना मी त्यांच्याशी बोललेली नसेन, म्हणून काय असा मुर्खासारखा निर्णय  घ्यावयाचा

समीरबरे, मग, तुम्ही काय केलेत?

 Mrs. Arora: काहीच नाही, " I unfriended him, offcourse"


एक अनुवादित अनुभव. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा  वाईटच. "Facebook" " a love and hate relationship".