मध्यप्रदेशातील भोपाल येथे नौकरी आणी नागपूर येथे कुटूंब. शुक्रवारी रात्री छातीसगड एक्स्प्रेसने भोपाल येथून निघणे, शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचणे आणी रविवारी रात्री पुन्हा नागपूर येथून निघून सोमवारी सकाळी भोपाल ला पोहोचणे, हा नित्यक्रम. भोपाल येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नौकरी करणारी बरीच डॉक्टर मंडळी ह्या प्रवासात सोबत असतात (ह्या नौकरी ची एक नवीन व्याख्या " MCI professor", म्हणजे फक्त आठवड्यातून एक दिवस किंवा MCI चे inspection असेल तेंव्हाच उपस्थित राहणे, एरवी आपल्या शहरात मस्त practice करणे. काय होत असणार त्या विध्यार्थ्यांचे देवालाच माहित. असो ). अश्याच एका प्रवासात AC III tyre च्या बोगीत वरच्या बर्थवर मी आणी माझ्या बाजूच्या बर्थवर medicine चे एक " MCI professor", भोपाल ला जाणारे. ओळखीचेच असल्यामुळे झोपेपर्यंत गप्पा सुरु होत्या. खालच्या बर्थवर एक पती पत्नी, वय अंदाजे ७५ ते ८० च्या आसपास. बिलासपुर येथून भोपाल ला मुलाकडे जाणारे. त्या स्त्रीचे पती बहुदा आजारी असावेत,कारण आम्ही बोगीत शिरलो तेव्हा ते झोपलेलेच होते.
रात्रीचे १.००-१.३० वाजले असतील, गाढ झोपेत होतो, आणी अचानक खालील बर्थ वरील स्त्री चा जोर जोराने रडण्याच्या आवाजाने जाग आली. रडत होती आणी जोर जोरयाने नवर्याला हलवून उठविण्याचा प्रयत्न करीत होती. खाली उतरून विचारले, क्या हो गया मांजी? म्हणली देखो ना, बिलकुल हालचाल नाही कर रहे. अंगावरील पांघरून बाजूला करून प्रथम pulse पहिली, लागतच नव्हती. तो पर्यंत आजू बाजूचे प्रवासी जागे झाले. MCI professor पण खाली उतरले. मी म्हणलो, सर जरा बघा ना, सरांनी pulse पहिली, छातीवर हात ठेवून काही तरी तपासण्याचा प्रयत्न केला. माझी मात्र खात्री झालेली कि दुर्दैवाने ह्या प्रवाशाचा मृत्त्यू झालेला आहे. आणी सर, बहुदा पुढील झेंगट मागे लागेल म्हणून हळूच बाजूच्या बोगीत त्यांच्या इतर मित्रांकडे निघून गेलेत. शेवटी मी खूप धीर करून त्या स्त्रीला वस्तुस्थिती समजून सांगितली. तिच्याजवळ तिच्या पतीची केस फाइल होती, ती बघितली. १ वर्षापूर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झालेली, मधुमेह, उच्च रक्तदाब असणारी ही व्यक्ती. त्यामुळे अचानक झालेला हा मृत्त्यू हृदयविकारानेच झालेला. जरी हे पती पत्नी चांगल्या आर्थिक परिस्थितील असले तरी, त्या स्त्रीजवळ अश्या स्थितीत कोणाला संपर्क साधावा काहीच माहित नव्हते. मोबाइल देखिल नव्हता त्यांच्या जवळ, त्या व्यक्तीच्या खिशात शोधल्यानंतर एका कागदावर २-३ फोन नंबर मिळाले. त्यात एक नंबर त्यांच्या भोपाळच्या मुलाचा होता. त्याचेशी संपर्क साधून सर्व वस्तुस्थिती कथन केली. आणी नंतर सुरु झाले शासकीय कार्य. त्या स्त्रीला आम्ही सर्व समजावून शांत करण्याचा प्रयत्न करीत होतो (दुसरे काहीही करणे शक्य नव्हते). तेवढ्यात बोगीतील निरीक्षक आलेत. त्यांनी सांगितले, इटारसी स्टेशन ला कळविले आहे. त्या स्त्रीला सांत्वना देण्यापलीकडे काहीच करणे शक्य नव्हते. हतबलता म्हणजे काय हे त्या क्षणी समजले. सकाळचे ४-४.३० वाजले असतील, इटारसी स्टेशन वर डॉक्टर आणी स्टाफ हजरच होता. डॉक्टर म्हणले मृतदेह येथेच उतरवून postmortam आणी इतर कार्यालयीन बाबी पूर्ण केल्यानंतरच नातलगांच्या स्वाधीन केला जाईल. मृत व्यक्ती सोबत फक्त एक ७५ वर्षांची स्त्री, तिची बिकट परिस्थिती, कोणावरही असा प्रसंग ओढवू नये. मी डॉक्टरांशी बोललो, सर्व परिस्थिती समजावून सांगितली. त्यानाही वाईट वाटत होते पण कायद्याने त्यांचेही हात बांधलेले. शेवटी ते म्हणले, तुम्ही डॉक्टर आहात, त्या क्षणी तुम्ही होता, तुम्ही जर लेखी मृत्यूचे संभाव्य कारण आणी प्रमाणपत्र स्वाक्षरी करून दिलेत आणी हा मृतदेह त्यांचे नातेवायीकांचे स्वाधीन करण्याची लेखी हमी दिलीत तर मी आपणास हा मृतदेह भोपाळला नेण्याची परवानगी देतो. आमचे professor दुसऱ्या बोगीत जे गायब झालेत, पुन्हा उगवलेच नाहीत. medicine चे professor असल्यामुळे मी त्यांना भेटून प्रमाणपत्र देण्याची विनंती केली (मी ह्या विषयाचा expert नाही), पण साफ नकार दिला त्यांनी. उलट मलाच सल्ला दिला कि उगाच ह्या भानगडीत पडू नकोस, आपणाला काय माहित मृत्त्यू कशामुळे झाला तो, उगाच पोलिसांचे लचांड कशाला लावून घ्यावयाचे. पण मला समोरील चित्र दिसत होते. त्या मृतदेहासोबत एकटीच एक म्हातारी स्त्री. रात्रभर रुग्णालयात आणी नंतर postmortam कक्षाबाहेर बसलेली. कदाचित ४-५ तासानंतर भोपाळ येथील तिचा मुलगा पोहचेल देखील. शेवटी निर्णय घेतला आणी मीच आवश्यक प्रमाणपत्र लिहून दिले, आणी हा मृतदेह आणी त्या स्त्रीला सांभाळत सकाळी ६.३० ला हबीबगंज स्टेशन ला पोहचलो. त्या स्त्रीचा मुलगा आणी इतर नातेवायिक उपस्थित होतेच. आतिशय हतबल आणी अगतिक स्थितित विचार करितच घरी पोहोचलो. सतत त्या ४-५ तासांचे चित्र आणी तो प्रसंग. अजुनही तो प्रसंग अंगावर शाहारे निर्माण करतो. ह्या सम्पूर्ण स्थितिचे विश्लेषण केल्यास खलिल बाबी आपणास शिकवुन जातात:
१. वयस्कर आई वडिलाना असे एकटे प्रवासाला पाठविणे मुलाना शोभते काय?, त्यातल्यात्यात अश्या आजारी वडिलांना म्हातारया आईसोबत एकटे प्रवासाला पाठविणे, आणी प्रवासही १५-१६ तासांचा.
२. विशेषत वयस्कर व्याक्तिनी प्रवासाला जाताना आपली आरोग्य विषयक कगद्पत्रे सोबत ठेवणे गरजेचे आहे. आणी सोबतच लागणारी औषधे सुद्धा.
३. सहज प्राप्त होतील अश्या ठिकाणी महत्वाचे फोन नम्बर (आपल्या doctor चा देखिल नम्बर) ठेवणे. कारण कोणत्याही क्षणी त्यांचा उपयोग होऊ शकतो.
४.प्रवासी doctor असल्यास - आपल्यासोबत सतत emergency medicine ची किट ठेवणे. कदाचित तुम्हालाच त्याचा उपयोग होवु शकेल.
५. प्रवासी doctor - असला प्रसंग निर्माण झाल्यास बाजुच्या बोगित पळून न जाता आपले कर्तव्य प्रथम पूर्ण करण्याचा प्रयत्न. प्रसंगी असे प्रमाणपत्र देवुन काही मदत होत असल्यास थोडी फार जोखिम देखिल घेण्यास हरकत नाही.
आणी अति महत्वाचे - ज्या आई वाडिलानी आपल्याला मोठं केलं त्याना असे एकटे प्रवासाला पाठविणे, मानुसकीला धरून आहे काय ह्याचे आत्मपरीक्षण? आणी आपल्या म्हातारपणी असला प्रसंग आपणावर आल्यास? ह्याचे चित्रण ?
ज्या आई वाडिलानी आपल्याला मोठं केलं त्याना असे एकटे प्रवासाला पाठविणे, nischitach मानुसकीला धरून nahi. good article for self interrospection . nandu
ReplyDeleteह! असे अनुभव वारंवार येतात प्रवासात. असा प्रसंग कोणावरही येऊ शकतो ....त्या प्रसंगातले डॉक्टरांचे वागणे मात्र अनाकलनीय होते यात शंका नाही.
ReplyDeleteCommonsense is not so common!
ReplyDeleteMany a times knowingly or unknowingly such blunder mistakes take place. This incidence is an eye opener for close relatives & mainly for'BHAGODE' money making machines. Fortunately 'GOD' was there but GOD can't be everywhere all the times.......
R.P.Rokade
Dr.Kanchanmala Ghorpade: This is fact of life & I fully agree that one has to make his own arrangements in life. Wwe cannot depend on others.
ReplyDeleteI know u r a senior IMA member. Can I IMA seriously do something for such "MCI Professors,just earning money: Dr.Rohit
ReplyDeleteyes this a heart touching experience.a lesson to all.we all should have that much sense to help who is realy in need.
ReplyDeletevery true.
ReplyDeletewe shouold always help the people atleast who are really helpless
It is certainly a very heart wrenching incident.what the author did is a sign of being a good and compassionate human being .But as we all know there are two sides to a coin. many a times it happens that the elderly people do not accept their vulnerability,and want to behave in an independent manner. it can be that the son wanted to accompany them or he was against the travel itself but because of his parents stubborness to prove that they are capable in this age also he had to bow to their wish. we will never know.there are all kinds of children in this world and why when any elderly person is seen suffering the blame goes to the children when they might be completely innocent and helpless in the situation.And as for the MCI professor they are altogether a different species. "NO COMMENTS" for them.
ReplyDeleteThanks for your encouraging comments. Please continue reading my blog.
ReplyDeletedoctor,farch chan. aapan khup changle aahat.
ReplyDelete