Monday, April 29, 2013

पपा का शरबत


मागील शुक्रवारची घटना. संध्याकाळी ४ वाजता office  मध्ये काम करीत असताना, माझ्या  office  मधील एका सहकाऱ्याच्या घरून फोन आला. त्याचा मुलगा स्टूल वरून पडल्याचा message होता आणि त्याला तत्काळ घरी बोलावले होते. घरी काही तरी emergency असेल हे गृहीत धरून मी देखील त्याच्यासोबत त्याचे घरी निघालो. घरी त्याची पत्नी रडत बसली होती.…. 

घटना: माझ्या सहकाऱ्याला दोन मुले, मोठा ७  वर्षांचा आणि लहान ३  वर्षांचा. घरी TV च्या showcase मधील एका काचेच्या कपाटात नेहमीच २-३ drinks च्या बाटल्या. अगदी २-३ महिन्यातून एखाद्यावेळी, जवळचे कोणी मित्र आल्यास त्यांचेसोबत हा सहकारी ड्रिंक्स घेणार. पत्नीला  काही हे आवडत नव्हते पण "social drinking" ह्या सोज्वळ नावाखाली तिला पटत जरी नव्हते तरी हळू हळू तिने हे accept केलेलं होते. 

घरी, मोठ्या मुलाच्या हातात आणि पायात काही काचेचे तुकडे गेलेले होते, रक्तस्त्राव सुरु होत. Hall मध्ये एक फुटलेली बाटली आणि दरवाजा उघडल्याबरोबर आलेला दारूचा  घमघमाट. मुलगा एक ठिकाणी बसून रडत होता, अतिशय घाबरलेला होता. एका क्षणात सर्व परिस्थिती लक्षात आली, office कार मधून first-aid ची box मगविली, मुलाला सुदैवाने विशेष लागले नव्हते. पायात आणि हातात फुटलेल्या काचेच्या  तुकड्यांमुळे किरकोळ जखमा झाल्या होत्या, त्या clean करून, dressing केले, कोठेही शरीरात काचेचे तुकडे रुतलेले नाहीत ह्याची खात्री केली. ह्या सर्व कालावधीत पत्नी रडत होती आणि नवरा दिसल्याबरोबर ह्या सर्व घटनेला तो कसा जबाबदार आहे म्हणून त्याला सतत दूषण देत होती. नवरा घाबरून गेलेला, काहीच बोलत नव्हता. नशीब, घरी गेल्याबारोबर हि घटना पाहून एक reactive behavior म्हणून मुलाला शिव्या द्यायला किंवा मारायला सुरवात केली नाही. 

घटनेची पार्श्वभूमी: घरी drinks घेताना मुलाने बघीतल्यानंतर विचारल्यास, " कुछ नाही बेटा, शरबत ले रहे है, और यह बडे लोगोंका शरबत  है" हे नेहमीचे वडिलांचे explanation. त्या दिवशी, मुलाची आई काही समान आणण्यासाठी बाहेर गेलेली, घरात कामवाली बाई घरची कामे करीत होती. Hall मध्ये हा मुलगा खेळत होता. आपणही वडिलांचे शरबत प्यावे म्हणून त्याने एक छोटा stool सरकवून त्यावर उभा राहून काचेच्या कपाटातील बाटली काढली आणि stool वरून खाली उतरतांना बहुदा पाय किंवा stool घसरला असावा, हातातील काचेची बाटली खाली पडली आणि फुटली. घाबरून तो मुलगा खाली पडला आणि काही काचेचे तुकडे त्याच्या पायात आणि हातात गेलेत.  एक दीड तासांनी मुलगा थोडा शांत झाल्यानंतर "पापा का शरबत पिणे के लिये मै बोतल निकाल रहा था" हे सांगितले. 

पत्नी हि साहजिकच चिडलेली आणि घाबरलेली होती. मला म्हणाली, " भाईसाब, ये रोज बच्चोन्के सोतेसामय उनसे बहोत अच्छी  अच्छी बाते करते ही, उन्हे कहानिया सुनाते हैं, लेकिन जब कभी बहारसे भी ड्रिंक्स लेके आते है तो घर आतेही चूपचाप सो जाते है. बच्चा पुछता हैं, mumy आज पापा को क्या हो गया है, बिन बात किये हि सो गये है और उनके पास गये तो शरबत कि बांस आती हैं, बताइये उसे क्या जबाब दू"

घरी आल्यानंतर ह्या घटनेचाच विचार करीत होतो, सतत ती घटना डोळ्यासमोर येत होती. सुदैवाने थोडक्यात बचावले, पण काहीही घडू शकले असते आणि काय काय घडू शकले असते हे चित्र डोळ्यापुढे येउन, अंगावर काटा उभा राहिला, मन विषन्न झाले, भीतीही वाटायला लागली.  "social drinking" चांगले कि वाईट हा प्रत्येकाच्या विचाराचा प्रश्न, मुले मोठी होताना पालकांना बघत असतात, त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यांचे समोर drinks घ्यावेत कि टाळावेत?, त्यांना काय सांगावेत?, आम्ही ड्रिंक्स घेत आहोत कि खोटे बोलून शरबत घेत आहे हे सांगावेत? अगदी खरे सांगितल्यास अश्या घटना खात्रीपुर्वक टाळणे शक्य होईल काय? 

आणि सर्वात महत्वाचे, सामाजिक आणि आर्थिक उन्नत विभक्त कुटुंब, पती-पत्नी दोघेहि उच्च शिक्षित, नौकरी करणारे, घर आणि मुले कामवाल्या बाई च्या भरवशावर, त्यामुळे असले प्रसंग आपल्या घरात देखील घडू शकतात काय, ह्याचे आत्म विश्लेषण करण्याची गरज आहे ?.  "social drinking" घरी आणि कामा निमित्त्याने party मध्ये घेणे हा  एक socilization चा मापदंड. हळू हळू "social drinking",  "compulsive drinking" झाल्याची अनेक उदाहरणे. आपला stamina इतरांपेक्षा कसा जास्त आहे हे सांगण्यात एक अभिमान, पण  हळू हळू  हाच  stamina आपणाला "compulsive uncontrolled  drinking"   कडे तर नेत नाही ना? 

घटना अतिशय गंभीर आहे. माझ्या सहकाऱ्याने कसे वागावयास हवे होते, मुलांना काय सांगावयास हवे ह्यावर प्रत्येकाचे वेग वेगळे विचार असू शकतील. पण हे काही अंकगणित नाही, जेथे २+२ = ४ होईल. केव्हा,कोठे, कधी आणि किती drinks घ्यावेत, आगदी स्पष्टपणे केंव्हा नाही  म्हणावे, "social drinking" आणि  " social but  compulsive uncontrolled  drinking" ह्यामधील "thin line " अगदी वेळीच ओळखून योग्य निर्णय कसा घ्यावा, हे प्रत्येकाने ठरवायचे आहे. पण ही घटना मात्र ब्रेन च्या कॉम्पुटर च्या hard डिस्क वर store  करणे  गरजेचे आहे. सर्वांनाच आपली मुले अतिशय प्रिय असतात, मग त्यांच्यासाठी तरी अश्या पालकांनी काही तरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे असे वाटते. 

हातात आणि पायात काच गेलेला, अतिशय घाबरलेला तो ६-७ वर्षांचा मुलगा अजूनही माझ्या डोळ्यासमोर मला दिसून अंगावर काटा  उभा राहतो….