Sunday, December 26, 2010

अनकॉमन कॉमनसेन्स


मध्यप्रदेशातील भोपाल येथे नौकरी आणी नागपूर येथे कुटूंब. शुक्रवारी रात्री छातीसगड एक्स्प्रेसने भोपाल येथून निघणे, शनिवारी सकाळी नागपूरला पोहोचणे आणी रविवारी रात्री पुन्हा नागपूर येथून निघून सोमवारी सकाळी भोपाल ला पोहोचणे, हा नित्यक्रम. भोपाल येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात नौकरी करणारी बरीच डॉक्टर मंडळी ह्या प्रवासात सोबत असतात (ह्या नौकरी ची एक नवीन व्याख्या " MCI professor", म्हणजे फक्त आठवड्यातून एक दिवस किंवा MCI चे inspection असेल तेंव्हाच उपस्थित राहणे, एरवी आपल्या शहरात मस्त practice करणे. काय होत असणार त्या विध्यार्थ्यांचे देवालाच माहित. असो ). अश्याच एका प्रवासात AC III tyre च्या बोगीत

Saturday, December 11, 2010

पैसा गाठी - आरोग्यासाठी !


दोन वर्षांपूर्वी माझ्या आईची नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात angioplasty करण्यात आली.

काही गुंतागुंती निर्माण झाल्यामुळे तिला ५-६ दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले होते. त्या कालावधीत मी सतत रुग्णालयात
होतो. इतर रुग्णांच्या नातेवायीकांचे आपसातील संभाषण ऐकणे किंवा त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारणे हा त्या कालावधीतील महत्वाचा विरंगुळा. राजेश अगरवाल (नाव बदललेले) हा मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील अतिशय मध्यमवर्गीय आर्थिक
परिस्थितील गृहस्थ. ७५ वर्षाच्या आल्या आईला ह्याच रुग्णालयात दाखल केलेले. तपासणीअंती डॉक्टरांनी हृदयाची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. राजेशचे वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, राजेश चे गावात एक छोटेसे किराण्याचे दुकान,
त्यचे लग्न झालेले आणी त्याला दोन मुले. अतिशय सर्वसाधारण अशी आर्थिक परिस्थिती. राजेशच्या आईला मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार, त्यामुळे हृदयाची शस्त्रक्रिया

Saturday, December 4, 2010

कुटुंब नियोजनाकरिता "स्ट्रेपसील्स strategy"


संदेश वहनाच्या प्रक्रियेत संदेश देणारी व्यक्ती आणी सर्वांना समजेल अशी भाषा, ऐकणार्यांची त्या क्षणी असणारी समज आणी मानसिकता अतिशय महत्वाची असते. अन्यथा प्राप्त होणारा संदेश, ह्या संदेशातून समजणारा अर्थ आणी संदेशानुसार अपेक्षित कारवाही ह्यात थोडीशीही तफावत झाल्यास अर्थाचा अनर्थ घडू शकतो.

१९८० च्या दशकाच्या सुरवातीला महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागात एक अतिशय तडफदार, कार्यकुशल आणी कोणत्याही परिस्थितीत नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे हा आग्रह असणारे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर कार्यरत होते. त्या कालावधीत महाराष्ट्र राज्याला सतत भारत सरकारतर्फे कुटुंब नियोजन कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्धल दरवर्षी बक्षीस मिळायचे. परंतु उद्दिष्ट साध्य करताना कामाची गुणवत्ता ह्याकडे मात्र दुर्लक्ष व्हायचे. ह्या सचिवांचे इतरत्र स्थानांतर झाल्यानंतर दुसरे एक IAS अधिकारी सचिव ह्या पदावर रुजू झालेत. पहिल्या दिवसापासूनच निव्वळ आकड्यांपेक्षा कामाची गुणवत्ता जास्त महत्वाची आहे हा महत्वपूर्ण संदेश त्यांनी देण्यास सुरवात केली. साहजिकच काम एकदम कमी झाले. त्या वर्षी कुटुंब नियोजन कार्य अतिशय असमाधानकारक