Sunday, September 26, 2010

गोष्ट प्रत्येक लीनाची ?


सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या १९ वर्षांच्या लेकीला तिची आई गर्भपातासाठी क्‍लिनिकमध्ये घेऊन आली. आईने दिलेले गर्भपाताचे कारणही सयुक्तिक होते. तिच्या लेकीचा नवरा त्यांच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा. त्याला दोन बहिणी आणि साहजिकच त्याच्यावर बहिणींच्या लग्नाची जबाबदारी. नजीकच्या भविष्यातील आर्थिक जबाबदारी लक्षात घेता तिने आणि तिच्या नवऱ्याने दोन वर्षे मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवाने हे नियोजन फसले आणि ती गर्भवती राहिली. या कहाणीच्या आधारे त्यांच्या मुलीचा वैद्यकीय गर्भपात करण्यास काहीच कायदेशीर अडचणी नव्हत्या; पण या साऱ्या चर्चेत मुलीची आईच फक्त बोलत होती आणि ती

का रे दुरावा ?


" पन्नाशी हे तारुण्यातील म्हातारपण तर साठी ही म्हातारपणातील तारुण्य"

कोणत्याही वाहनास त्याला लागणारे आवश्यक इंधन आणी तेल मिळाले नाही तर वाहन बंद पडते. मानवी जीवनही वाहनाच्या पेट्रोल च्या टाकी सारखे आहे. तारुण्य टिकविण्यासाठी भूतकाळातील प्रेमाची टाकी भरलेली असणे आवश्यक आहे. मानवी जीवनातील "साठी" हा एक महत्वाचा कार्यकाल आहे. माझे आयुष्य आताही निरर्थक नाही, आपली कोणाला तरी गरज आहे, ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणी माझ्यात ही क्षमता आहे, ही मानसिकता ह्या कालावधीत पुरुषात निर्माण झाल्यास, जीवन जगण्यात त्याला अधिक आनंद, उत्साह वाटायला लागतो. आनंदाने, उत्साहाने जीवन जगण्यासाठी, मी काही एकटी नाही, मला माझ्या जोडीदाराची योग्य सोबत, साथ आहे, ही भावना

Saturday, September 18, 2010

जगणे म्हणजे ...

जगणे म्हणजे ...

किशोरावस्था - शालेय जीवन:
४-५ मित्र, खूप मस्ती, खूप वेळ, खूप खेळ, वेळ मिळाल्यास अभ्यास, तासनतास गप्पा, खूप भांडणे पुन्हा मैत्री, जीवापाड मैत्री
४-५ मित्र, शाळेसमोरील ५ पैशात मिळणारे बोरकूट/बोरे, सर्वांनी मिळून मजेत खाणारे
४-५ मित्र, आजचा क्षण मनसोक्त आनंदात जगण्याचा, उद्याची चिंता नाही.

तारुण्य - महाविद्यालयीन जीवन:
४-५ मित्र... सर्वांच्या खिशात मिळून ४-५ रुपये, एका मित्राजवळ एक जुनाट स्कूटर, एक

Monday, September 6, 2010

सुसंवाद?


सुसंवाद?

ग्रामीण लोकांची बोलीभाषा न समजल्यास काय घडू शकते ह्याची ही काही उदाहरण:

प्राथमिक आरोग्य केंद्रात वैध्यकीय अधिकारी ह्या पदावर कार्यरत असताना, समीर वझे माझ्या केंद्रात इंटर्नशिप करण्यासाठी आलेला एक तरुण. वडील उच्चपदस्थ अधिकारी, समीरचे convent नंतर चे मुंबई येथे college मधील शिक्षण. आयुष्यात खेडी म्हणजे काय असते प्रथमच बघणारा. प्रत्त्येक रुग्ण तपासल्यानंतर आवर्जून साबणाने स्वछ्य हात धुणारा.

माझ्या कक्षात सकाळी OPD च्या वेळी बसलो होतो. समीरही माझ्या बाजूला बसून

Wednesday, September 1, 2010

लहान होतो मी जेव्हा ...


लहान होतो मी जेव्हा, जग बहुतेक खूप मोठ होत...................
मला अजूनही आठवतो .......... घरापासून शाळेपर्यंतचा तो रस्ता........... काय काय नव्हते त्या रस्त्यावर ...........
ते मंगल कार्यालय, घरघरनारी ती पिठाची गिरणी, धोब्याचे, शिंप्याचे, किराण्याचे ते दुकान आणी प्रत्येक ठिकाणी थांबून शाळेत जाणारी आम्ही मुले. संघ बिल्डिंग चे ते मारुती चे देऊळ, त्यावर असणारया टीनांवरून घसरगुंडी खेळणारी ती मुले, आम्हीही थोडावेळ घसरगुंडीवर खेळायचो. मारुतीच्या देवळात नारळ फोडायला येणाऱ्या भाविकाची आणी एक तुकडा खायला मिळेल ह्या आशेने रोज देवळापाशी वाट पाहणारे आम्ही. बुधवार बाजारातील ती जुन्या पुस्तकांची दुकाने, शाळेसमोरील उकडलेली बोरे, बोरकूट, चुरण, icefruit