"पहिले पाऊल" कोणाचाही आधार न घेता पहिले पाऊल टाकण्याचा हा प्रयत्नं. जीवनाच्या आतापर्यंतच्या प्रवासात मागे वळून ह्या प्रवासाच्या पाऊलवाटेच्या काही महत्वाच्या खुणा आजूनही स्मरणात साठवलेल्या आहेत त्या आपणापुढे
मांडण्याचा हा एक प्रयत्नं. आतापर्यंतच्या आयुष्याचे सिंहावलोकन करताना आज मी ज्या ठिकाणी पोहोचलेलो आहो, जीवनात जे काही प्राप्त केलेले आहे ते केवळ अनाकलनीय वाटतंय. बरेचदा तर हे सत्य कि मृगजळ हा देखील प्रश्न पडतो? आतिशय विपरीत आर्थिक परिस्थितीत झालेले शिक्षण. वैद्यकीय महविद्यालयात शिक्षण घेत असताना तर cycle देखील नव्हती. First MBBS उत्तीर्ण झाल्यानंतर